आपलं शहर

mumbai corona news: कोरोना नियंत्रणात! 60% बेड रिकामे, हॉस्पिटलांचा भार झाला कमी…

बीएमसी आणि इतर कोव्हिड केअर सेंटरमधील रूग्णांसाठी आरक्षित 60 टक्के बेड रिकामे आहेत त्यामुळे हळूहळू हॉस्पिटलवरील भार देखील कमी झाला आहे

Mumbai corona news:लाॅकडाऊनमुळे (Lockdown) मुंबईतील कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. हॉस्पिटल्स आणि कोव्हिड केअर सेंटरमधील (covid care center) रिकाम्या बेडवरुन आपण याचा अंदाज नक्कीच लावू शकतो. मुंबईत तर तीन जंबो कोव्हिड सेंटर (jumbo covid center) दुरुस्तीसाठी बंद असूनही, बीएमसी आणि इतर कोव्हिड केअर सेंटरमधील रूग्णांसाठी आरक्षित 60 टक्के बेड रिकामेच आहेत. याव्यतिरिक्त दररोज नवीन कोरोना रूग्णांची थेट 10000ते 12000वरून एक ते दीड हजारांपर्यंत पोहोचली आहे.तर दुसरीकडे दररोज नवीन रुग्णांच्या तुलनेत 100 टक्के पेक्षा जास्त रुग्ण डिस्चार्ज होत आहेत. (Corona under control! 60% of beds are empty, hospital load is reduced)

महानगरपालिकेच्या (BMC) म्हणण्यानुसार कोव्हिड हॉस्पिटल आणि कोव्हिड केअर सेंटरमध्ये सध्या 20,472 सामान्य विभागात (General ward) बेड रिकामे आहेत, तर ऑक्सिजनच्या 7,324 बेड, आयसीयूचे (ICU) 532,व्हेंटिलेटरचे (ventilater) 147, पीआयसीयूचे (PICU) 13, एनआयसीयूचे (NICU) 15 बेड रिकामे आहेत.नेस्कोमध्ये (NESCO) 1,489 बेड रिकामे आहेत.

दहिसर, मुलुंड आणि बीकेसी जंबो कोव्हिड केंद्रे दुरुस्तीमुळे बंद झाली आहेत. तर गोरेगावमधील नेस्को जंबो कोव्हिड सेंटरमध्ये आयसीयू वगळता 1,489 बेड रिकामे आहेत. नेस्कोचे डीन डॉ.नीलम अंद्राडे म्हणाल्या की, 2,015 बेड असलेल्या नेस्कोमध्ये 394 ऑक्सिजन (Oxygen) आणि 1,067 विना-ऑक्सिजन ( non-oxygen) बेड रिकामे आहेत

अनेक हॉस्पिटल्सचे भार कमी झाले….

बीएमसी, नायर, सायन, केईएम यांसारख्या प्रमुख हॉस्पिटलवरील रुग्णांचा भार कमी झालेला दिसून येतोय.याबद्दल बोलताना सायन हॉस्पिटलचे (sion Hospital) डीन डॉ.मोहन जोशी (Dr. Mohan Joshi) म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असल्याने आयसीयू आणि व्हेंटिलेटर वगळता सामान्य विभागातील बेड रिकामे आहेत त्यामुळे हळूहळू हॉस्पिटलवरील भार देखील कमी झाला आहे. (The load of many hospitals was reduced ….)

तर 727 पैकी 125 बेड रिकामे असुन, आयसीयूमध्ये देखील 6 बेड रिकामे असल्याची माहिती नायर हॉस्पिटलचे (Nayar Hospital) डीन डॉ.रमेश भारमाल (Ramesh Bharmal) यांनी दिली.त्याचबरोबर केईएम हॉस्पिटलचे डीन डॉ.हेमंत देशमुख म्हणाले की केईएम हॉस्पिटलमध्येदेखील (KEM Hospital) 80 टक्के बेड रिकामे आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments