आपलं शहर

Mumbai corona update : मुंबईतील कोरोना कमी होण्यावर आरोग्य मंत्रालयाची मोठी माहिती..

मुंबईत कोरोनाचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे, आरोग्य मंत्रालयाने त्यामागचे कारण सांगितले.

मुंबईत सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुंबईत कोव्हिडच्या नवीन प्रकरणांवर नियंत्रण कसे ठेवले यासंदर्भात माहिती दिली. मुंबईत सोमवारी 1794 लोकांना, रविवारी 2403 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, मुंबई हे एक मोठे शहर आहे. महानगरपालिका (BMC) आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांनी कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी फार मोठे योगदान दिले, त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या पातळीवर कंट्रोल रूम न करता त्यांचे 24 वॉर्डात 24 कंट्रोल रूम बनवले. ‘
कोरोना चाचणीचे सर्व निकाल मुख्य कंट्रोल रूमवर पाठविण्यात आले. त्यानंतर, केवळ फोन ऑपरेटर,डॉक्टर , इतर कर्मचारी आणि रुग्णवाहिका ही सर्व कंट्रोल रूममध्ये तैनात करण्यात आल्या.

रुग्णांना हॉस्पिटल ची गरज भासल्यास रुग्णवाहिका उपलब्ध केल्या .तसेच मुंबईत 800 एसयूव्हींना देखील रूग्णवाहिका बनवल्या गेल्या. आयटी ऑपरेशन्सद्वारे त्याचे परीक्षण केले गेले आणि हॉस्पिटलमध्ये बेड शोधण्यासाठी, एक केंद्रीकृत डॅशबोर्ड तयार केला गेला. जेणेकरुन रुग्णांना त्रास होणार नाही.

 

ते पुढे म्हणाले की ,भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अशा बर्‍याच प्रांतांमध्येही अशी पावले उचलली जात आहेत. लव अग्रवाल म्हणाले की, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगडसह 12 राज्यात दररोज कोरोनाची प्रमाण कमी होत आहेत.

रात्रीचे कर्फ्यू आणि लॉकडाऊनमुळे
कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाली परंतु याचा अर्थ असा नाही की लोकांनी निष्काळजीपणाने वागले पाहिजे. तरीही आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. प्रत्येकाचे सहकार्य महत्वाचे आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments