खूप काही

Mumbai corona update : बायको डायलिसिसवर, नवरा तीचे दागिने विकून इतरांना पुरवतोय मोफत ऑक्सिजन

कोरोना महामारीच्या काळात पास्कल साल्धना आपल्या आजारी पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांना मदत करत आहेत

मुंबई : कोरोना महामारीच्या दरम्यान, काही माणसे देवदूतांसारखी लोकांच्या मदतीसाठी धावून आली . यापैकीच एक म्हणजे मुंबईतील पास्कल साल्धाना, पास्कल यांची पत्नी डायलिसिस(Dialysis)वर आहे, तरीही त्यांनी आपल्या पत्नीचे ऑक्सिजनचे सिलेंडर दुसर्‍याला दिले आहेत. एवढेच नाही तर, आता ते आपल्या पत्नीच्या सांगण्यावरुन तीचे दागिने विकून मिळालेल्या पैशातून इतरांना विनामूल्य ऑक्सिजन देत आहेत.

मुंबईत ‘मंडप सजावटी’चे काम करणाऱ्या पास्कल साल्धाना यांनी आपल्या दोन्ही किडनी बिघडल्यामुळे डायलिसिसवर असलेल्या त्यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार लोकांना मोफत ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात केली , असे त्यांनी सांगितले .

पास्कल सल्धाना म्हणाले, “त्यांची पत्नी डायलिसिस आणि ऑक्सिजनच्या आधारावर आहे त्यामुळे त्यांच्याकडे नेहमीच एक अतिरिक्त सिलिंडर असते. एके दिवशी एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी पास्कल यांना त्यांच्या पत्नीच्या ऑक्सिजनसाठी बोलावले. पास्कल यांच्या पत्नीने आग्रह धरल्यानंतर त्यांनी सिलिंडर दिला. त्यानंतर पत्नीच्या विनंतीनुसार त्यांनी तिचे दागिने विकले आणि त्यातून मिळालेल्या 80,000 रुपयांतून 18 एप्रिलपासून लोकांना मोफत ऑक्सिजन देणे सुरू केले आहे. आता लोक त्यांना मदत करण्यासाठी हळू पैसे देखील देऊ लागले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments