आपलं शहर

Mumbai Corona Vaccine : साध्या फ्रीजमध्ये कोरोनाची लस, 5 स्टार हॉटेलला मनमानीभार समोर कार

लसीकरणाचा अंधाधुंध कारभार चालवल्याचा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी केला आहे.

Mumbai Corona Vaccine : 

मुंबईतील हॉटेलमध्ये सध्या फ्रिजमध्ये कोरोनाच्या लसी साठातून ठेवल्याचा मोठा खुलासा समोर आला आहे. नियम मोडून लसीकरणाचा अंधाधुंध कारभार चालवल्याचा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, कोरोना लसींचा तुटवड्यामुळे लसीकरणामध्ये अडथळा पाहायला मिळत आहे. लस उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील लसीकरण थांबवले आहे. अशा अवघड परिस्थितीत मुंबई येथील अंधेरी भागात एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सध्या फ्रिजमध्ये कोरोना लस साठवून ठेवल्याचे चित्र समोर आले आहे.

या हॉटेलमधून लसींची सीलबंद पॅकेट ताब्यात घेण्यात आली आहेत. ही कारवाई मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने केली आहे. त्यांनी सांगितले आहे की अंधेरी पूर्वमधील ललित हॉटेलच्या फ्रीजमध्ये लसीचा साठा सापडला आहे.

या कारवाईनंतर मुंबई मिररमधील एका वृत्तानुसार, महापौरांना माहिती दिली गेली की या हॉटेलने क्रिटिकल कॅरियर हॉस्पिटल बरोबर परस्पर संवाद केला होता. हॉस्पिटलने (vaccine) लसीची खरेदी केंद्र सरकारकडून केली, परंतु याची माहिती बीएमसी किंवा राज्य सरकार यांना नव्हती, महापौरांनी सांगितले की ललित हॉटेलला हॉस्पिटलमधून एक प्रस्ताव आला होता, की येथे लसीकरण केले जाईल. प्रस्ताव असा की ज्या व्यक्तींच्या कुटुंबात लसीकरणानंतर काळजी घेण्यासाठी कुणी नाही ते लसीकरणानंतर हॉटेलमध्ये राहू शकतात. तरीही येथे 500 लोकांना लसीकरण केले गेले.

हॉस्पिटलने लस कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्याचे पालन केले नाही. या घटनेचा खुलासा करून सांगितले की बीएमसी केंद्राकडे लसी उपलब्ध नसताना रुग्णालयाला कोरोना वैक्सिनचा डोस कसा मिळाला? असा सवाल महापौरांनी केला आहे.

महापौरांनी सांगितले की मला मिळालेल्या माहितीनुसार लससाठी योग्य फ्रीज स्टोरेज नसल्याने लसीकरण घेतलेल्या अनेक लोकांवर त्यांचा दुष्परिणामही जाणवू शकतो. आता त्यावर तपास चालू आहे.

यापूर्वी केंद्राने हॉटेलवर लसीकरण केले का :

सरकारने अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ज्या काही संस्था विरोधात जातात आणि हॉटेलबरोबर भागीदारी करून लसीकरणाचे पॅकेज देतात, त्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
मंत्रालयाच्या केंद्रीय आरोग्य सचिवांनी हॉटेलमध्ये लसीकरण तत्वावर विरोध आहे, तरीही हे सगळं सुरू असल्याचं मत महापौरांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments