आपलं शहर

Mumbai Local Update : खोट्या ओळखपत्रावर लोकल प्रवास पडेल महागात, आतापर्यंत कोट्यवधींचा दंड वसूल…

1 एप्रिल ते 31 मे पर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां 75 हजार 793 प्रवाशांवर कारवाई करून एकूण 3 कोटी 97 लाख रुपयांचा दंड केला वसूल.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईची लोकल सेवा बंद करण्यात आली होती. तर ही लोकलसेवा फक्त अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी चालू आहे.14 एप्रिलपासून सामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी बंदी घालण्यात आली होती. तरीही काही लोक रोज नियमांचे उल्लंघन करून लोकलमधून प्रवास करत आहेत. रेल्वे प्रशासनाची नजर चुकवून नियमांचे उल्लंघन करून लोकलने प्रवास करत असाल तर आत्ताच थांबा.

रेल्वेचे तिकीट मिळवण्यासाठी लोकांनी तयार केले खोटे ओळखपत्र
रेल्वेचे तिकीट मिळविण्यासाठी अनेक लोकांनी आपले खोटे ओळखपत्र तयार केले आहे. तर अनेक लोक विनातिकीट प्रवास करत आहेत. सामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवासाला बंदी घालण्यात आली असल्याने केवळ अत्यावश्यक सेवांशी निगडित असलेले कर्मचारी लोकल सेवेचा उपयोग करू शकतात. त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांनी स्वतःचे खोटे ओळखपत्र तयार केले आहे.(People used fake IDs to get train tickets)

रेल्वेने वसूल केला कोट्यवधींचा दंड
नियमांचे उल्लंघन करून प्रवास करणाऱ्या 65 हजार लोकांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. यात अनेकांकडून दंड वसुलण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेकडे कोट्यवधींचा दंड जमा झाला आहे. 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां 75 हजार 793 प्रवाशांवर कारवाई करून एकूण 3 कोटी 97 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.(Railways received crores of rupees in penalties)

500 रुपये दंड आकारण्यात आला
17 एप्रिल ते 21 मे या काळात मास्क न लावणाऱ्या 1 हजार 61 प्रवाशांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर 808 प्रवाशांनी खोटी ओळख पत्र तयार करून रेल्वेतून प्रवास केला असल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. यात अनेकांनी महानगरपालिकेचे खोटे ओळखपत्र तयार केल्याचे समोर आले. अशा प्रवाशांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसुलण्यात आला.(A fine of Rs 500 was levied on passengers traveling without masks)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments