खूप काही

Mumbai Local update : लाॅकडाऊनमध्ये मुंबई लोकलचे नवे नियम जाहीर, उच्च न्यायालयाचे आदेश

सामान्य लोकांच्या लोकलमधील प्रवासाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने घेतला निर्णय .

महाराष्ट्रात कोरोना झपाट्याने वाढत आहे त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात 15 मेपर्यंत लॉकडाऊन आहे(Lockdown in Maharashtra) ,या सर्वांमध्येच मुंबई लोकल ट्रेनची ताजी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) सांगितले की, कोरोना च्या साथीत होणारी वाढ लक्षात घेता मुंबईतील लोकल ट्रेन (Mumbai Local), मेट्रो आणि मोनोरेलच्या वाहतुकीवर बंदी कायम राहील. राज्य सरकारतर्फे बाजू मांडताना अ‍ॅडव्होकेट पीपी काकडे यांनी न्यायमूर्ती के.के तातेड आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाला सांगितले की केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना मुंबईतील लोकल, मोनोरेल आणि मेट्रो ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी असेल.

एएस पीरजादा यांनी कोर्टात सहकारी बँक कर्मचारी संघटनेच्या (CBEU) वतीने बँकांमधील कर्मचार्‍यांना अत्यावश्यक बँक सेवेसंदर्भात ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी याचिका दाखल केली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळीही सप्टेंबर 2020 मध्ये रेल्वे आणि राज्य अधिकाऱ्यांनी सहकारी आणि खासगी बँक अधिकाऱ्यांना लोकल ट्रेन(Mumbai Local train), मेट्रो (Mumbai metro) आणि मोनोरेलमध्ये जाण्यास परवानगी दिली होती, असे पीरजादा म्हणाले. यावर कोर्टाने साथीच्या दुसर्‍या लाटेत राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचार्‍यांना लोकल ट्रेन वापरण्याची परवानगी दिली नाही.

कोव्हिड-19 चा संसर्ग आजही राज्यात पसरत आहे. अशा परिस्थितीत सध्या कोणासाठीही लोकल ट्रेन चालू करू शकत नाही परंतू राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यास परवानगी मिळवण्यासाठी कागदपत्रे सीबीईयूने कोर्टात दाखल केले तर मग कोर्टात पुन्हा यावर विचार केला जाईल .

महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आता फक्त आपत्कालीन सेवांमधील कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलमध्ये प्रवास करता येईल म्हणजेच मुंबई लोकल न्यू ट्रॅव्हल मार्गदर्शकतत्त्वांमध्ये(Mumbai Local New Travel Guidelines) आता फक्त सरकार, वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या लोकांना, विशेषत: अपंगांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments