खूप काही

Mumbai Municipal News : मुंबईत कोरोनाची लाट कमी, मात्र दुसऱ्या संकटाची चाहूल, मुंबईकरांनो सावधान…

कोरोनाच्या या काळात सर्वत्र मनुष्यबळाची कमतरता असताना मुंबईत नालेसफाई होणार की नाही हा मोठा प्रश्न समोर आला आहे.

Mumbai Municipal News : मे महिना संपण्याआधीच राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच काही दिवसात मुंबईतही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पावसाळा ऋतू सुरू झाला की प्रत्येक वर्षी मुंबई एक मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे मुंबईतील रस्त्यावरील खड्डे आणि नालेसफाई त्यात आधीच असलेला कोरोना यामुळे मुंबई पालिकेसह मुंबईकरांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.कोरोनाच्या या काळात सर्वत्र मनुष्यबळाची कमतरता असताना मुंबईत नालेसफाई होणार की नाही हा मोठा प्रश्न समोर आला आहे.

मुंबई हे असे शहर आहे की जिथे थोडा मुसळधार पाऊस झाला तरी अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात होते, त्यातच हिंदमाता, दादर, गांधी मार्केट आणि इतर प्रमुख भागात कमी वेळात पाणी भरून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. पावसाचे पाणी साचू नये म्हणून दरवर्षी नालेसाफ केले जाते. प्रत्येक वर्षी प्रशासनाकडून आणि महानगरपालिकेकडून अनेक दावे केले जातात, परंतु नालेसफाई हा विषय कधी संपतच नाही, यावर्षी ही प्रत्यक्षात असे कोणतेच काम झालेलं नाही. कोरोनाच्या काळात लढ्यात मुंबईकरांना पावसाळ्यात या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

पालिकेकडून जरी नालेसफाई झाल्याची 100 टक्क्यांची प्रत दिली गेली तरी दर वर्षी मुंबईत पाणी साचतेच. गेल्यावर्षी पालिकेने केलेल्या 113 टक्के नालेसफाईचा दावा विरोधकांकडून खोटा ठरवला गेला, तो निव्वळ कागदोपत्री असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली होती. भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाठ यांनी याबद्दल माहिती दिली.


राज्यात असलेल्या कोरोनाच्या लढ्यात पालिका प्रशासन आधीच गुरफटलेली असून आता तिसऱ्या लाटेची तयारी करत आहे. त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. राज्यात पावसाचे चित्र दिसत आहे, यात पालिकेने दिलेल्या दाव्यात मुंबईतील नाल्यांची सफाई अजूनही झालेली नाही याचा मोठा फटका मुंबईला बसणार आहे. मिठी नदीतील गाळ काढला असून इतर काही नालेसफाई बाकी आहे, मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईत पाणी भरण्याची शक्यता दिसत आहे. असा इशारा विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.

कोरोनामुळे पालिकेच्या इतर योजनांवर परिणाम झालेला दिसत आहेत, परंतु मुंबई पालिकेने नालेसफाईचे काम पूर्ण झाले असा दावा केल्यानंतरही दावा झाला नसल्याचे समोर आले आहे. तसेच पालिकेच्या समोर मनुष्यबळाचे प्रश्न निर्माण झाले आहेत, तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नदीवर तरंगणारा कचरा उचलण्यासाठी परदेशी यंत्रांची मदत घेतली जात आहे. हे सर्व पाहता यावर्षी नालेसफाईचे काम धीम्या गतीने सुरु असल्याचे समोर आले आहे अशई माहिती राष्ट्रवादीच्या नगरसेविका राखी जाधव यांनी दिली.

या सगळ्या वादविवादांमध्ये सामान्य मुंबईकरांच्या घरात पाणी शिरणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे प्रत्येक मुंबईकराने स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी, इतकच.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments