खूप काही

Mumbai News : चांगली बातमी; नौसेनेच्या जहाजातून 40 मेट्रिक टन ऑक्सीजन मुंबईत दाखल, वाचा सविस्तर माहिती…

नौसेनेच्या जहाजातून 40 मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सीजन मुंबईत दाखल.

देशात कोरोनाचे प्रमाण वाढल्यामुळे ऑक्सिजनचा अभाव निर्माण झाला होता यामुळेच वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी समुद्र सेतु-2 (Samudra Setu-2) या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. याच अभियानांतर्गत रविवारी भारतीय नौदलाचे त्रिखंड हे जहाज कतार येथून 40 मेट्रिक टन द्रव स्वरुपातील वैद्यकीय ऑक्सिजनसह (liquid medical oxygen) मुंबईत दाखल झाले.

नौसेनेच्या (Indian Navy) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीखंड (INS Trikand) हे कतार वरून 20-20 टन द्रवस्वरुपातील ऑक्सीजनचे 100 सिलेंडर घेऊन मुंबईत दाखल झाले आहे.

कोव्हिड-19 च्या प्रकरणातील वाढ लक्षात घेऊन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी चालू असलेल्या राष्ट्रीय संघर्षाला चालना देण्यासाठी भारतीय नौदलाने समुद्र सेतू -2 हे अभियान सुरू केले होते.
यासाठी आयएनएस त्रिखंड यांच्यासह नऊ जहाजे समुद्र सेतू -2 मोहिमेअंतर्गत पर्शियन खाडी (Persian Gulf) .आणि दक्षिण-पूर्व आशियातील (southeast Asia) सहयोगी देशांकडून वैद्यकीय उपकरणे आणि द्रव ऑक्सिजन आणण्यासाठी ठेवण्यात आली.

समुद्र सेतु 2 या अभियानांतर्गत याआधीही आयएनएस कोची (INS Kochi) आणि आयएनएस टाबर (INS Tabar) ही जहाजे 11 मे रोजी पाच कंटेनर आणि 1200 ऑक्सिजन सिलिंडरमध्ये 100 टन द्रव स्वरुपातील ऑक्सिजन (LMO-liquid medical oxygen ) सह भारतात परतले.त्याचबरोबर 10 मे रोजी सिंगापूरहून क्रायोजेनिक ऑक्सिजनच्या 8 टाक्या व अंदाजे 4000 ऑक्सिजन सिलेंडर् आयएनएस ऐरावत (INS Airavat) ने विशाखापट्टणममध्ये पोहोचवले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments