Mumbai: नाशिकसह मुंबईच्या रेल्वे स्थानकांवरही होणार ऑक्सिजन पार्लरची उभारणी.
रेल्वे प्रशासनाच्या वतीने मुंबईत रेल्वे स्थानकांवर आता 'आॅक्सिजन पार्लर 'उभारले जाणार

मुंबई : सध्या रेल्वे प्रशासनामार्फत अनेक पर्यावरणपूरक प्रकल्प राबवण्यात येत आहेत.नाशिक रेल्वे स्थानकाप्रमाणे आता मुंबईतदेखील काही रेल्वे स्थानकांवर ‘ऑक्सिजन पार्लर ‘प्रकल्प राबवला जाणार आहे. याअंतर्गत शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज गल्लीत ‘हर्बल गार्डन’ची निर्मिती केली आहे. रेल्वे प्रशासनाचे उत्पादन वाढवण्यासाठी हि योजन राबवली जाणार आहे.
‘ऑक्सिजन पार्लर’ नेमकं काय आहे?
ऑक्सिजन पार्लर या प्रकल्पांत 18 प्रकारची विविध सर्वाधिक ऑक्सिजन देणारी रोपटी रेल्वे स्थानकांवर लावण्यात येणार आहेत.यामध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचा देखील समावेश असेल.यात प्रामुख्याने वॉरिगेडेट स्नेक प्लान्ट, विपिंग फिंग, स्पायडर प्लान्ट, चायनीज बांबू या प्रकारची झाडे असणार आहेत.
नाशिकमध्ये न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम (NINFRIS)(New Innovative Non fair Revenue Ideas scheme) मार्फत अनेक ऑक्सिजन पार्लर सुरु करण्यात आले आहेत.
लवकरच मुंबईत ‘ऑक्सिजन पार्लर’ ची उभारणी
मुंबईत मध्य रेल्वे प्रशासनाकडून सीएसएमटी, एलटीटी,दादर ठाणे कल्याण या टर्मिनसचे सर्वेक्षण करण्यात आले असून ऑक्सिजन पार्लर उभारण्यासाठी निविदा (Tender) काढल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांत ‘अॉक्सिजन पार्लर’ उभारण्यात येईल .
ऑक्सिजन पार्लर हा एक पर्यावरणपुरक प्रकल्प असला तरीही या प्रकल्पामुळे रेल्वेला महसुल मिळणार आहे असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.