फेमस

Mumbai Police : मुंबई पोलिसांची क्रिएटीव्हिटी, पहा भन्नाट डायलॉगबाजी

मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे बॉलिवूड अभिनेत्यांचे फोटो घेऊन त्यांच्या प्रसिद्ध डायलॉगचा वापर करून केले ट्विट

कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर आणि सामाजिक आंतर राखणे महत्त्वाचे आहे. तरीदेखील अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळते तर काहीजण मास्कचा देखील वापर करत नाहीत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटरद्वारे एक क्रिएटिव्ह पद्धतीने लोकांना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.

स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा हे लोकांपर्यंत वेगळ्या पध्दतीने पोहोचवले आहे. ही पद्धत अतिशय गमतीदार असून मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे बॉलिवूड अभिनेत्यांचे फोटो घेऊन त्यांच्या प्रसिद्ध डायलॉगचा वापर करून कॅपशन बनवले आहेत. मुंबई पोलिसांनी केलेले ट्विट लोकांना प्रचंड आवडल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक लोकांनी ट्विट शेअर केले आहे.(Mumbai Police creatively tweeted to people to follow the rules)

सर्वात पहिला अमिताभ बच्चनचा फोटो घेऊन त्या फोटोच्या खाली एक कॅप्शन दिले आहे. ‘ऐसे मास्क पहनना भी कोई मास्क पहनना है लल्लू?’ आणि त्याच फोटोच्यावरती असे लिहिले होते की ‘बिग-बी लंडर- वेअरिंग युअर मास्क बिलो नोज'(Big-B lunder- wearing your mask below nose).

दुसरा फोटो अभिषेक बच्चनचा असून ‘लॉकडाऊन संपेपर्यंत आपले ‘हाऊसफुल’ असुद्या, बाहेर जाण्याची कुठलीही बहाणे चालणार नाहीत’. असं मजेशीर कॅप्शन दिले होते. तर फोटोवरती ‘अभी’ फर्स्ट बंप, ‘शेख’ हँड्स व्हेन इट्स सेफर प्लीज!(‘Abhi’ first bump, ‘shek’ hands when it’s safer please!) असे लिहले आहे.

त्याचबरोबर सुपरस्टार राजेश खन्ना याचादेखील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर असे लिहिले आहे की ‘राजेश’, ऑर्डर ‘खन्ना’ एट होम.(‘Rajesh’ order ‘khanna’ at home). आणि फोटोचा कॅप्शन असे लिहिले आहे की, ‘पुष्पा, वि हेट रुल ब्रेकर्स'(pushpa, we hate rule- breakers!).

इतकेच नाही तर नवी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री दीपिका पादुकोणचा फोटो देखील पोस्ट केला आहे आणि या पोस्ट वर असे लिहिले गेले आहे की, ‘एक छोटे से मास्क की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू?’
‘सुरक्षेचं सर्वोत्तम साधन असतो, एक छोटासा मास्क’.


अभिनेता रणवीर सिंग याच्या फोटोवर लिहिले आहे की ‘रॅन आऊट ऑफ वीर? ऑर्डर ऑनलाईन'(‘Ran’ out of groceries ‘veer’? Order online!) तर फोटोच्यावर कॅप्शन लिहिले आहे की, ‘चिटीं की चाल, बाज की नजर और वायरस के बढणे पर संदेह नही किया करते’. त्याच बरोबर असे लिहले होते की, ‘बाहेर जाण्याचा ‘अपना टाईम आयेग’ पण लॉकडाऊन संपल्यावर!’

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments