आपलं शहर

जॅकलिनने केली पोलिसांना अशी मदत, मुंबई पोलिसांनी मानले ट्विटरवरून आभार…

मुंबई पोलीस करत असलेल्या कामाचे जॅकलिनने आभार मानले आहेत. अभिनेत्रीने आपल्या अधिकृत ट्वीट अकाउंटवरून ट्वीट करून लिहिले आहे की ती मुंबई पोलिसांना सलाम करते कारण ते आपली कामगिरी चोख बजावतात.

कोरोना काळात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजने (Jacqueline Fernandez) फ्रंटलाइन काम करणाऱ्यांसह अनेक सामान्य नागरिकांना मदत केली आहे. तिचे हे काम पाहून मुंबई पोलिसांनी तिचं कौतुक केलं आहे. मुंबई पोलिसांनी एक ट्विट करत ती करत असलेल्या कामाचं कौतूक केलं आहे.

सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनामुळे देशाची अवस्था आणखी बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूड सेलिब्रेटीही मदतीसाठी पुढे येत आहेत. सेलिब्रेटी केवळ लोकांनाच नव्हे तर फ्रंट लाईन योद्ध्यांनाीही मदत करत आहेत. आता या यादीमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज हिचेही नाव समाविष्ट झाले आहे. जॅकलिनने नुकतेच ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.(JacquelineFernandez, Mumbai police, CoronaPandemic, Maharashtra Police)

मुंबई पोलीस करत असलेल्या कामाचे जॅकलिनने आभार मानले आहेत. अभिनेत्रीने आपल्या अधिकृत ट्वीट अकाउंटवरून ट्वीट करून लिहिले आहे की ती मुंबई पोलिसांना सलाम करते कारण ते आपली कामगिरी चोख बजावतात. मग पाऊस असो, वादळ असो, जॅकलिन पुढे असेही लिहिते की ती प्रत्येक गोष्टीबद्दल मुंबई पोलिसांचे आभार मानते.

जॅकलिनने मुंबई पोलिसांच्या स्वादिन काही रेनकोट्स दिले आहेत. लवकरच पावसाळा येत आहे, त्यामुळे त्यातून वाचण्यासाठी जॅकलिनची ही छोटीशी मदत पोलिसांसाठी मोठी ठरणार आहे. तसेच मुंबई पोलिसांनी जॅकलीनचे तिच्या योगदानाबद्दल आभार मानले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments