आपलं शहर

Mumbai vaccination update: लसीकरणाचे नवे नियम जाहीर,शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी….

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईतील परदेशात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास परवानगी दिली

Mumbai vaccination update: परदेशातील विद्यापीठांमध्ये (foreign university) प्रवेश मिळालेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांना प्रवासापूर्वी कोव्हिड-19चे लसीकरण (vaccination) करण्याची गरज असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईतील परदेशात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास परवानगी दिली आहे. (New vaccination rules announced, important news for those going abroad for education…)

परंतु लसीकरणास पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाल्याचे काही कागदपत्र महानगरपालिकेच्या कोव्हिड सेंटरला दाखवावे लागतील,असे महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी जाहीर केले.

युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलेल्या ट्विटमध्ये सांगितले की, परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी (31मे,1 जून,2जून) राजावाडी , कूपर आणि कस्तुरबा या केंद्रांवर विनामूल्य, वॉक-इन (walk-in) लसीची व्यवस्था केली आहे.

विद्यार्थ्यांना I-20 किंवा DS -160फॉर्म आणि वैयक्तिक आयडी कागदपत्रे कोव्हिड सेंटरला दाखवावी लागतील. लस आणि परदेशांतील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे या दोन्ही गोष्टींवर त्यांचे भविष्य अवलंबून असल्याने सरकार आपले कर्तव्य व्यवस्थित रित्या पार पडेल असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांना देखील शिक्षणासाठी परदेशात जाण्यापूर्वी वेळेत लस मिळावी यासाठी. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील, अशी माहिती दिली आहे.

समोर आलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार एकूण 6 शहरांमधल्या जवळपास 11 लाखांहून अधिक लोकसंख्येपैकी आठ लाख लोकांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या नव्या लसीकरण नियमांनुसार कोव्हिशील्ड (covishield) लसीच्या दुसर्‍या डोस ची वाट पाहणारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि फ्रन्टलाईन कर्मचारी तसेच कोवॅक्सीन लसीच्या दुसरा डोसची वाट पाहणारे कर्मचारी आणि 45 ते 60 या वयोगटातील दुसरा डोससाठी पात्र असलेले नागरिक सोमवार, मंगळवार आणि बुधवार (30मे, 1जून, 2 जून) या तीन दिवसात थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊ शकतात. (walk in vaccination)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments