आपलं शहर

मुंबईकरांनो लक्ष द्या, 27, 28, 29 मे रोजी असं असेल लसीकरणाचे नियोजन, थेट केंद्रावर जाण्याची मुभा

मुंबईकरांना 24मे ते 26मे या तीन दिवसात कोणत्याही ऑनलाईन बुकिंग शिवाय थेट केंद्रावर जाऊन लस (vaccine) घेता येईल

Corona vaccine update : बृहन्मुंबई महानगरपालिका कोरोनाचे लसीकरण व्यवस्थितरीत्या पार पडण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहेत त्यातच पालिकेने पुढील आठवड्यातील लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार 24मे ते 26मे या तीन दिवसात नागरिकांना कोणत्याही ऑनलाईन बुकिंग शिवाय थेट केंद्रावर जाऊन लस (vaccine) घेता येईल या नंतर 27मे ते 29मे या तीन दिवसात नागरिकांना लस घेण्यासाठी ऑनलाईन बुकींग करावीच लागेल याशिवाय रविवारी (30मे 2021 रोजी )सर्व लसीकरण केंद्रे बंद राहतील.

कोरोनाच्या लसीचे वितरण सुरळीतपणे होण्यासाठी महानगरपालिकेने नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत त्या सूचना मार्फत पालिकेने लसीकरणा संबंधी सर्व नियम व अटी स्पष्ट केल्या आहेत

थेट लसीकरण केंद्रात येण्याची मुभा कोणाला?

1.कोव्हिशिल्ड लसीच्या पहिला डोसचे लाभार्थी(60 वर्षे व त्यावरील वयोगट)

2.कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी पात्र असलेले नागरिक
(60 वर्षे व त्यावरील वयोगट)

3. अत्यावश्यक सेवांमधील आरोग्य कर्मचारी तसेच आघाडीवरील (front line) इतर कर्मचारी वर्गातील लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेले नागरिक(45 व त्यावरील वयोगट)

4. 45ते 59 वयोगटातील लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेले नागरिक.
या सर्व वेळापत्रकाच्या नियोजनात कोणत्याही कारणामुळे बदल झाल्यास प्रसार माध्यमांमार्फत किंवा समाज माध्यमांचमार्फत 1 दिवस आधी पूर्वसूचना देण्यात येईल असे महानगरपालिकेने आवाहन केले आहे. (Who is allowed to come directly to the vaccination center?)

कोण कोण कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी पात्र आहे?

कोरोनाचा लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेले सर्व वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सीन (Covaxin) लस घेता येईल. 27मे ते 29 मे 2021 या तीन दिवसात कोवीन वेबसाईटवर (covin website) लसीकरणासाठी नोंदणी करूनच वेळ व लसीकरण केंद्र ठरवल्यानंतरच नागरिकांना लसीकरण केंद्रात येऊन लस घेता येईल असे पालिकेने सांगितले आहे मात्र रविवारी (30 मे 2021) लसीकरण केंद्रे ही पूर्णपणे बंद राहतील.(Who is eligible for the covaxin vaccine?)

लस घेताना पहिल्या व दुसर्‍या डोसमध्ये किती अंतर असावे?

आरोग्य विभागाने सुरुवातीला कोव्हिशिल्ड (Covishield) लसीच्या दोन डोसमध्ये 6 ते 8आठवड्यांचे अंतर असावे असे सांगितले होते परंतु आता किमान 12 ते 16 आठवड्यांचे अंतर म्हणजेच पहिल्या डोस घेतल्यावर 84 दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा अशी सूचना केंद्र सरकारने जाहीर केली आहे.(What is the distance between the first and second dose after vaccination?)

कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळ लसीचे वितरण व लसीकरणाचे नियोजन सुरळीत व्हावे यासाठी नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) सहकार्य करावे अशी विनंती पालिकेने केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments