आपलं शहर

Mumbai Corona Update : मुंबईचा पॉझिटिव्ह दर 3.14 टक्क्यांवर, तर डबलिंग रेट गेला एक वर्षाच्या पलिकडे…

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार 1 जून ते 15 दिवस लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याच्या तयारीत आहे.

Mumbai Corona Update : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार 1 जून ते 15 दिवस लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, मात्र एक दिलासादायक बातमीही समोर येतेय. ती म्हणजे मुंबईतील रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर 20 दिवसांमध्ये 61 टक्क्यांनी खाली आला आहे.

शुक्रवारी (28 मे 2021 रोजी) कोरोना टेस्टिंगचा पॉझिटिव्ह दर 3 टक्क्यांवर आला. शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे 929 नवीन रुग्ण आढळले, तर कोरोनामुळे 30 लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य तज्ञांच्या मते अजून नियम काटेकोरपणे पाळले तर कोरोनाला संपूर्णरित्या नियंत्रणात ठेवू शकतो.

मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येबरोबरच मृत्यूची संख्याही कमी होत आहे. गेल्या 3 दिवसांत मृतांची संख्या 30 ते 35 पर्यंत घटली आहे. दरम्यान, कोरोना चाचणीच्या पॉझिटिव्ह रेटचा आलेख दिवसेंदिवस कमी होत आहे. 8 मे रोजी मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण 8.02 टक्के होते, गेल्या 20 दिवसात ते 61 टक्के कमी झाले. 28 मे रोजी पॉझिटीव्हिटी दर 3.14 टक्क्यांपर्यंत खाली आला.

ब्रेक द चैन मोहीम यशस्वी ठरत आहे, असे बीएमसीचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांची म्हटलं आहे. ‘ब्रेक द चैन’ अभियानाचा हा परिणाम आहे. मुंबईत दररोज सरासरी 30 हजार लोकांची कोरोना टेस्ट केली जाते. यानंतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा मागोवा घेऊन वेळीच उपचार केला जात आहे. त्वरित उपचार आणि सकारात्मक रूग्णांच्या त्वरित संपर्क साधून व्हायरसचा प्रसार थांबविला जात आहे.

या सगळ्यात अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा दर एका वर्षाचा आहे. 8 मे रोजी मुंबईचा दुप्पट दर 145 दिवस होता, जो 20 दिवसांत 370 दिवसांवर पोहोचला आहे. म्हणजेच आता कोरोना रूग्णांच्या संख्येच्या दुप्पट होण्यास एक वर्ष लागेल. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments