आपलं शहर

परप्रांतिय मुंबईच्या दिशेने रवाना, रेल्वे भरून येत असल्याची अधिकाऱ्यांची माहिती

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव कमी होताच, परप्रांतीयांनी पुन्हा मुंबईची वाट धरली आहे

  • कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव कमी होताच, परप्रांतीयांनी पुन्हा मुंबईची वाट धरली आहे. हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांपासून कारागिर, बांधकाम अशा अनेक क्षेत्रात काम करणारे परप्रांतिय मुंबईकडे रवाना झाले आहेत.

जरी अनेक परप्रांतिय मुंबईकडे येण्यासाठी निघाले असले तरी अनेकांच्या ट्रेनचे तिकीट मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईकडे रिकामी जाणाऱ्या गाड्या आता पुन्हा भरून जात आहेत. पाऊस असूनही, अनेक स्थानकांवर गर्दी वाढू लागली आहे. गोरखपूर जंक्शनचा विचार केल्यास दरदिवशी सहा हजार प्रवाशांच्या जागी आथा 9 ते 10 हजार प्रवासी परराज्यात जाण्यास निघाले आहेत, त्यातले अनेक नागरिक मुंबईच्या दिशेने रवाना होत असतात.

खरं तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव कमी होताच परप्रांतीयांचे हजारो तरुण कामगार आता कामावर परतले आहेत. कोरोनाची भिती, पंचायत निवडणुका आणि अनेक घरगूती कार्यक्रम अशा अनेक कारणांनी मुंबईतून बाहेर गेलेल्या रहिवाश्यांनी पुन्हा मुंबईकडे येणाऱ्या ट्रेन पकडण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील अनेक कंपन्यांना अनलॉक होण्याची शक्यता वाटत आहे, त्यामुळे कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कॉल करण्यास सुरवात केली आहे. यापूर्वीच तिकीट बुक केलेल्या परप्रांतीयांचा प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे, मात्र अचानक तिकीट बूक करणाऱ्यांना काही अडचणींना सामना करावा लागत आहे. अनेकांनी कन्फर्म तिकिटे मिळत नसल्याची तक्रारही केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments