आपलं शहर

अजब! मुंबईत एका दिवसात फक्त 2678 रुग्ण, पाहा काय आहे कारण…

दुसरीकडे, महाराष्ट्रात गेल्या एका दिवसात तब्बल 53,605 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत.

देशात कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे वाढत आहेत, परंतु महाराष्ट्राची राजधानी मुंबईत ही संख्या कमी होत आहे. एकेकाळी सर्वाधिक त्रास झालेल्या मुंबईत गेल्या 24 तासांत केवळ 2678 नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्याचकाळात 62 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रात गेल्या एका दिवसात तब्बल 53,605 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईतील 3608 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत बरे होणार्‍या नागरिकांची संख्या 82,266 झाली आहे. तर महाराष्ट्रातील 864 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात संक्रमित होणाऱ्यांची एकूण संख्याही वाढली आहे, ती आता 50,53,336 आहे. त्याचबरोबर आतापर्यंत एकूण 43,47,592 लोक बरे झाले आहेत. मृतांचा आकडा 75,277 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात 6,28,213 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लावला आहे, परंतु अद्याप राज्यात राज्यात संक्रमणाची सरासरी वाढतच आहे, ही चिंतेची बाब असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी होत आहे. परंतु इतर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments