खूप काही

सोनू मुंबईत, रुग्ण जोधपूरमध्ये, ब्लॅक फंगसवरील इंजेक्शन दिल्लीमध्ये, तरीही वाचवला रुग्णाचा जीव, वाचा भन्नाट प्रवास

रुग्णाने मीडियामार्फत अभिनेता सोनू सूदकडे मागितली मदत. सोनू सूदने जोधपुरला पाठवले 10 इंजेक्शन

अभिनेता सोनू सूद याने जोधपूरमधील ब्लॅक फंगसच्या एका रुग्णाचा जीव वाचवला. जोधपूरमधील कमल किशोर सिंगल यांचे एआयआयएमएसमध्ये (AIIMS) इलाजा दरम्यान त्यांना लिपोसोमन एम्फोटेरिसीन बी इंजेक्शनची (liposomal amphotericin B) गरज होत. परंतु ते इंजेक्शन पूर्ण राजस्थानमध्ये कुठेही उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियामार्फत सोनू सूदकडे मदत मागितली होती. त्यालाच सोनूने रिप्लाय देत थेट जोधपूरला इंजेक्शन पाठवली आहेत.

त्यांनी इंजेक्शन दिल्लीतून मुंबईपर्यंत हवाई मार्गाने पाठवले त्यांनतर ते मुंबईवरून जोधपूरपर्यंत पोचवण्यात आले. सोनू सूद यांनी कमल याला निराश न करता त्याला मदत केली. जोधपूरमधील हितेश जैन आणि राजवीर सिंह हे दोघेही सोनू यांच्या टीमशी जोडले होते आणि हे दोघेही कोरोना काळापासूनच लोकांची मदत करत आहेत. हितेश आणि राजवीर यांची संस्था पोलीस कर्मचारी, हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि रुग्णांना पौष्टिक अन्न वाटपाचे काम करत आहेत. सोनू यांनी त्या दोघांना त्याच रात्री दिल्लीला पोचायला सांगितले होते. (Patient seeks help from Bollywood actor Sonu Sood through media .. 10 injections sent from Mumbai to Jodhpur)

दिल्लीवरुन जोधपूरपर्यंत पाठवण्यात आले इंजेक्शन
हितेश आणि राजवीर हे त्याच रात्री दीड वाजता दिल्लीमध्ये पोहोचले आणि साडे तीन वाजता त्यांना तिथे औषधाचे पार्सल मिळाले. त्यानंतर ते कुठेही न थांबता जोधपूरला जायला निघाले. आठ तासाच्या प्रवासानंतर पुन्हा जोधपूरमध्ये पोहोचले आणि सिंघल यांच्या परिवाराला ही 10 इंजेक्शन सोपवली.(The injection was sent from Delhi to Jodhpur)

वार्डमध्ये ब्लॅक फंगसचे रुग्ण
AIIMS च्या दोन वार्ड मध्ये 50 पेक्षा जास्त ब्लॅक फंगसचे रुग्ण आहेत. परंतु यांच्यासाठी एकसुद्धा इंजेक्शन उपलब्ध नाही. AIIMS च्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना जरी ब्लॅक फंगस झाला आणि उपचारासाठी ते या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले तरी त्यांनादेखील उपचारासाठी औषध मिळू शकणार नाही, इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. (Only black fungus patients in 2 wards)

जोधपुरमध्ये कुठेही उपलब्ध नाही ब्लॅक फंगसवरील औषध
जोधपूरमधील AIIMS मध्ये ब्लॅक फंगस रुग्णांवर अनेक वर्षापासून उपचार चालू आहे. परंतु रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेली त्यामुळे प्रशासन औषधांचा पुरवठा करण्यास असमर्थ झाली. प्रशासन आवश्यक औषधांची व्यवस्था करू शकली नाही. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, औषध आल्याशिवाय रूग्णांवर उपचार होणार नाहीत. त्यामुळे रुग्णांना ऍडमिट करण्याआधी या गोष्टींची कल्पना दिली जाते. कारण की ते वेळेतच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करू शकतील.(Black fungus medicine is not available anywhere in Jodhpur)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments