आपलं शहर

Mumbai Vaccine : ग्लोबल टेंडरसाठी फायझर कंपनीची माघार, आता BMC काय करणार?

फाइजर कंपनीने माघार घेतली. कंपनीने हे टेंडर मागे घेण्यामागे कोणतेही कारण दिले नाही

कोरोना व्हॅक्सिनच्या कमतरतेमुळे मुंबई महानगरपालिकेने डिप्लोमेसी सुरु केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बीएमसीने एकूण सहा शहरांकडून व्हॅक्सिन मिळण्यासाठी पत्र लिहिले आहे.

बीएमसीने सेंट पीटर्सबर्ग, न्यू यॉर्क, लॉस एंजिलीस, बुसान, स्टूटगार्ट आणि योकोहामा या शहरांनाकडून मदत मिळण्यासाठी शहर प्रमुखाला पत्र लिहले आहे. बीएमसीने या शहरातील प्रमुखांना 1 करोड 80 लाख लसींची मागणी केली आहे. या शहरांमध्ये याकोहामा शहराने याबाबत नकार दिला आहे.(Mumbai demanded vaccine from six sister cities)

1 करोड व्हॅक्सिनसाठी ग्लोबल टेंडर
1 करोड व्हॅक्सिनसाठी बीएमसीने ग्लोबल टेंडर जारी केले आहे. बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, या सहा शहरांना सिक्स सिस्टर सिटी असे म्हटले जाते. या शहरांचे आपापसातील संबंध खूप चांगले आहेत. ही शहरे कठीण प्रसंगात एकमेकांची मदत करतात.(Global tender for 10 million vaccines)

फाइजर कंपनीने माघार घेतली
1 करोड व्हॅक्सिनचे टेंडर भरणारी अमेरिकाची एक्स्ट्राजेनका फाइजर कंपनी आता मागे सरली आहे. त्यामुळे बीएमसीच्या व्हॅक्सिन अभियानाला मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर असे देखील सांगण्यात आले आहे की, कंपनीने हे टेंडर मागे घेण्यामागे कोणतेही कारण दिले नाही. आता बीएमसीकडे फक्त सहा कंपन्यांचे टेंडर बाकी आहेत. बाकीच्या सात कंपन्यांबरोबर अजून देखील चर्चा चालू आहे.(Pfizer withdrew for global tender)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments