खूप काही

Pollard playing shots पोलार्डचा स्टम्पच्या मागून शॉट, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘पी फॉर पॉवर’…

आयपीएल 2021 स्थगित झाल्यानंतर अनेक संघ चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांच्या प्लेअरचे न पाहिलेले व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत

Pollard playing shots : आयपीएल 2021 स्थगित झाल्यानंतर अनेक संघ चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांच्या प्लेअरचे न पाहिलेले व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत. या मालिकेत आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सनेही एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांचा धडाकेबाज फलंदाज किरन पोलार्ड (Kieron Pollard) सराव करताना चौकार आणि षटकार मारताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये, पोलार्ड सराव दरम्यान वादळी शैलीत खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मुंबईने ‘पी फॉर पोलार्ड आणि ‘पी फॉर पॉवर’ हे कॅप्शनमध्ये लिहले आहे, मुंबईने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे, पण तो खूप व्हायरलही होत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलार्डचा सराव करण्याचा एक अनोखा किस्सा समोर येतोय. सुमारे तीन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये पोलार्डने सराव करताना स्टंपच्या मागे खेळणे आणि शॉट्स खेळणे थांबवले नाही. त्याचे हे शॉट्स पाहून कोच शेन बाँडलाही धक्का बसलाय.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात पोलार्डने अवघ्या 34 चेंडूत 87 धावांची नाबाद खेळी केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments