फेमस

Rakhi Sawant Video : ये दुनिया ये मैफिल, मेरे काम की नही, पाहा राखीचा मस्तानी अवतार…

राखीचा व्हिडिओ आणि तिचा लूक पाहून लोकांनी तिला केले ट्रोल..

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत लोकांना आकर्षित करण्यात माहीर आहे. तिच्या वागण्याने ती कायमच सोशल मीडियावर लोकांच्या चर्चेत असते. यावेळी देखील असेच काही तरी झाले आहे. राखी चक्क मस्तानीचे कपडे परिधान करून रस्त्यावर फिरताना दिसली. तेव्हा राखीने सांगितले की, तिला बाजीरावला भेटायचे होते. ती अनेक वर्षांपासून त्याला भेटलेली नाही.

राखीचा नवीन लूक
राखी सावंत मस्तानीचा लूक करून बाजीरावला शोधत आहे असे तिने सांगितले. तिला रितेशला भेटायची एक संधी भेटली होती. परंतु आता तेही शक्य नाही होणार. त्याचबरोबर ती म्हणाली की, ना रितेश मिळत आहे, ना कपड्याची दुकान सुरू आहेत, ना मुंबई चालू होत आहे, ना लॉकडाऊन बंद होत आहे. त्यामुळे मी खूप जास्त उदास आहे. म्हणून मी निराश होऊन अशी भटकत आहे.(Rakhi’s new look: Rakhi Sawant does a Mastani to find her husband)

मी बाजीरावला शोधत आहे.
राखीने सांगितले की, ती खतारों के खिलाडीमध्ये देखील नाही जाऊ शकत. त्याचबरोबर माझं लग्न झाले असून देखील माझा नवरा मला भेटत नाही. ‘नच बलिये’ हा शो मला मिळाला होता. पण लॉकडाऊनमुळे तो शो देखील बंद होत आहे. रितेशला भेटण्याचा हा एकच चान्स होता. त्यामुळे तुम्ही मला मीरा बोला किंवा मस्तानी बोला. मी बाजीरावलाच शोधत राहणार.(Rakhi is looking for Bajirao)

राखी आहे गोल्डन फंगस
राखीचा हा व्हिडिओ पाहून लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओला ट्रोल केले. त्याचबरोबर राखीवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. एका चाहत्याने तिला गोल्डन फंगस अशी देखील उपमा दिली. तर एकजण म्हणाला की, कोरोनापेक्षा पण जास्त खतरनाक राखी आहे.(Rakhi is the golden fungus)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments