फेमस

Rakhi Sawant : फाटक्या कपड्यांमध्ये राखी सांवत फिरतेय रस्त्यांवर, म्हणाली कपडेच नाहीत…

राखीने सांगितले की, माझ्याकडे आता कपडे नाही आहेत. सगळे कपडे जुने झाले आहेत. त्यामुळे मी तेच फाटलेली कपडे घालते.

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सध्या कोणत्याही चित्रपटात दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ कायमच व्हायरल होत असतात. राखी सावंत चाहत्यांना मुंबईमध्ये दिसली होती तेव्हा तिने रीप्ड जीन्स घातली होती. त्यावर काही लोकांनी तिला प्रश्न विचारले तेव्हा राखीने सांगितले की, माझ्याकडे कपडे नाही आहेत, त्यामुळे मी फाटलेले कपडे घालत आहे.

लॉकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने मी फाटलेले कपडे घालते.
जेव्हा राखी सावंत अंधेरीला कॉफी शॉपमध्ये गेली होती तेव्हा तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या भोवती गर्दी केली. अनेक लोक व्हिडीओ करत होते. तिला तिच्या कंपडयांबद्दल विचारले गेले तेव्हा तिने सांगितले की, माझ्याकडे आता कपडे नाही आहेत. सगळे कपडे जुने झाले आहेत. त्यामुळे मी तेच फाटलेली कपडे घालते. दुकान बंद असल्यामुळे मी अजून काही करू शकत नाही.(Rakhi wears torn clothes as the shop is closed due to lockdown.)

खतरों के खिलाडीमध्ये भाग घेणार की नाही?
लवकरच खतरों के खिलाडीचा अकरावा सीजन चालू होणार आहे. त्या शोमध्ये अनेक बिग बॉस कंटेस्टेंट भाग घेणार आहेत. राखीला खतरों के खिलाडीमध्ये जाण्यावरून काही प्रश्न विचारले गेले. ज्यावर मजेदार उत्तर देताना राखी बोलली की, अभिनव शुक्लामुळे मी शोमध्ये जाणार नाही. कारण की मला अशी भीती वाटते की, मला पुन्हा एकदा अभिनववर प्रेम होईल.(Whether Rakhi Sawant will participate in Khatroon K Khiladi or not)

रितेश बरोबर लग्न का केले?
राखीला बॉलिवूडची ड्रामा क्वीन ही म्हटलं जातं. ती तिच्या पती रितेशबद्दल प्रत्येक वेळी काही ना काही सांगत असते. परंतु तिच्या पतीचा फोटो किंवा व्हिडिओ आजपर्यंत कोणी देखील पाहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी तिने सांगितले होते की, ती रितेशला खूप दिवसांपासून मिळू शकली नव्हती. त्याचबरोबर रितेश बद्दल सांगताना असे सांगितले की, गुजरातच्या एका मोठ्या डॉनपासून स्वतःला वाचवण्यासाठी मी रितेशबरोबर लग्न केले.(Why did Rakhi marry Riteish?)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments