कोरोना होऊन गेल्यावर इतके दिवस असतात अँटिबॉडीज, वैज्ञानिकांची माहिती
कोरोना होऊन गेल्यानंतरही इतके दिवस अँटिबॉडीज शरीरात टिकून राहतात अशी माहिती वैज्ञानिकांनी दिली

देशात कोरोनाचा(corona) संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या या युद्धामध्ये लस(Vaccine) हे एक मोठे हत्यार मानले जात आहे.कोरोनानंतर शरीरात तयार झालेल्या अँन्टीबॉडीजविषयी इटली(Italy)मधील शास्त्रज्ञांनी मोठी माहिती दिली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनामधून बरे झाल्यानंतर आठ महिन्यांपर्यंत, कोरोनाविरूद्धच्या अँन्टीबॉडीज रुग्णाच्या रक्तातच असतात.
मिलानमधील सॅन राफेल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्णांमध्ये तयार होणारे अँन्टीबॉडीज हे रुग्णांचे वय जास्त असूनही रक्तात उपस्थित असतात. अशा परिस्थितीत रुग्णाला कोणत्याही विषाणूमुळे आजारी पडण्याचा धोका खूपच कमी होतो.
इटलीच्या आयएसएस नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूट(ISS national Health institute) मध्ये काम करणाऱ्या संशोधकांनी गेल्या वर्षी कोरोनाची लक्षणे असलेल्या 162 रूग्णांची निवड केली.त्यांच्या रक्ताचे नमुने मार्च आणि एप्रिलमध्ये घेतले . यानंतर, कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने नोव्हेंबरमध्ये पुन्हा घेण्यात आले. आयएसएसशी सामायिक केलेल्या निवेदनात संशोधकांनी सांगितले की कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या शरीरात अँन्टीबॉडीज (Antibodies)असल्याचे आढळले.
संशोधकांनी केलेला अँन्टीबॉडिजचा अभ्यास ‘नेचर कम्युनिकेशन्स सायंटिफिक जर्नल'(Nature communications scientific journal)मध्ये प्रसिद्ध झाला आहे. संशोधनात असे आढळले आहे की काही रुग्णांमध्ये अँटीबॉडीज अधिक दिवस टिकून राहिल्या आहेत. संशोधकांनी कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर अँन्टीबॉडीजच्या विकासाचे महत्त्व यावर जोर दिला आहे.