खूप काही

Share Market Tips: Kotak Bank, ACC, Britannia शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास होईल फायदा…

कोटक महिंद्रा बँक,ACC, ब्रिटानिया इंडस्ट्रीज शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल.

कोटक महिंद्रा बँक, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि एसीसी सिमेंट यांसारख्या ब्लू चिप स्टॉक्समध्ये तेजी जिसण्याची शक्यता आहे. यासह, अनेक मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉकमध्येही तेजी दिसत आहे. मूव्हिंग एव्हरेज कन्व्हर्जन डायव्हर्जन चार्टमधून (Moving Average Conversion Diversion Chart) ही माहिती समोर येत आहे. (Kotak Mahindra Bank, Britannia Industries, ACC Cement)

दिवसाच्या तेजीत बुलिश क्रॉसओव्हर ट्रेंड तयार होत आहे. त्यानुसार बुधवारी आणि आगामी काळात 38 कंपन्यांचे स्टॉक्समध्ये तेजी दिसून येईल, त्यातील काही स्टॉक्स मंगळवारीच 13 टक्क्यांनी वाढले आहेत.

कोणते शेअर्स वाढू शकतात?

तेजीची शक्यता दाखवणाऱ्या शहरांमध्ये ओबेरॉय रियल्टीचे शेअर मंगळवारी २.4 टक्क्यांनी वाढून 545 रुपयांपर्यंत गेले होते. त्याचप्रमाणे आयएफबी इंडस्ट्रीज 5 टक्क्यांनी आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या शेअरच्या किमतीत 3.7 टक्क्याची वाढ नोंदवली आहे. मंगळवारी ज्युबिलेंट फूडवर्क्स 3% तर, दिलीप बिल्डकॉन 2.5% वर बंद झाला. त्याचप्रमाणे फिलिप्स कार्बनने दोन टक्क्यांनी वाढ केली होती. (What shares can rise?)

कोणते शेअर घटण्याची शक्यता

एमएसीडी निर्देशकांनुसार भारती एअरटेल, टाटा मोटर, सेल, कॅडिला हेल्थ केअर, फोर्टिस हेल्थ केअर, एसबीआय लाइफ, अलेम्बिक फार्मा आणि जमना ऑटो यांचे शेअर घटण्याची शक्यता आहे. जर चार्टवर शेअर पडण्याचा विचार केला तर सुबेक्स लिमिटेड, कोपरान लिमिटेड, पॅनासिया बायोटेक आणि ग्रीन पॅनेल इंडस्ट्रीजचा सहभाग असू शकतो. (Which stocks are likely to fall)

एमएसीडी निर्देशक म्हणजे काय?

स्टॉकची सध्याची माहिती, त्याची स्ट्रेंथ आणि त्याची रिव्हर्स होण्याची शक्यता तपासण्यासाठी एमएसीडी निर्देशकाचा उपयोग केला जातो. यात एक एमएसीडी लाइन, सिग्नल लाइन आणि बार चार्ट असतो. एमएसीडी चार्ट शेअर्सचा ट्रेंड दाखवतो. याचा वापर शेअर्सचे उतार आणि चढावचा ग्राफ पाहण्यासाठी केला जातो. What is MACD Indicator?

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments