खूप काही

SSC board exam 2021:दहावीच्या परीक्षा पुन्हा होणार? उच्च न्यायलयाने राज्य सरकारला घेतलं फैलावर…

10वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी.

SSC board exam 2021:कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यसरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता . यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत राज्य सरकारने (Maharashtra state government) कोणताच विचार केल्या नसल्याचे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ठणकावले आहे. अशाच रीतीने जर परीक्षावर बंदी घातली तर राज्याच्या आणि देशाच्या भविष्यावर देखील त्याचा परिणाम होईल त्यामुळे परीक्षा रद्द करू नये अशी विनंती उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली.(Will the 10th exam be held again? )

दहावीच्या पर परीक्षा रद्द करण्यासाठी
पुण्यातील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एस. जे. काथावाला(S. J. Kathawalla)व न्यायमूर्ती एस. पी.तावडे (S. P. Tavde) यांच्या खंडपीठात अखेर 10वी च्या परीक्षांबाबत येत्या आठवड्यात सुनावणी होईल असे मुख्य सरकारी वकील पी. ए. काकडे (P. A. Kakade) यांनी सांगितले.

न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

विद्यार्थ्यांसाठी दहावीचे वर्ष अत्यंत महत्वाचे असते त्यामुळे सरकार त्यांना प्रमोट करण्याचा विचार करून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करीत आहे सरकारने शिक्षणव्यवस्थेची अशी चेष्टा करून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ करणे हे न्यायालयाला मान्य नाही अशा प्रखर शब्दात उच्च न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली.(The court expressed displeasure)

विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव का?

कोरोना महामारीच्या(corona pandemic)पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 10वीच्या परीक्षा(10th board examination) रद्द करण्याचा निर्णय घेतला मग 12वीच्या परीक्षा(HSC board exam) अजून निर्णय का घेतला गेला नाही?विद्यार्थ्यांमध्ये असा भेदभाव का?
सरकारच्या या बेजबाबदार कारभारामुळे राज्याचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना प्रमोट करून राज्याचे भविष्य धोक्यात घालणे कितपत योग्य आहे ?असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारले.(Why discrimination among students?)

दहावीच्या परीक्षांबाबत लवकरच होणार सुनावणी

उच्च न्यायालयाने(Bombay high court)राज्य सरकारच्या कारभारातील हलगर्जीपणाला प्रखर शब्दात अमान्यता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या योग्यतेनुसार मूल्यांकन करण्यासाठी त्यांना प्रमोट करून गुण देणे हा योग्य मार्ग नाही .कोणताही विचार न करता कोरोनाच्या(Corona virus) पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत अशाप्रकारे खेळणे राज्य सरकारला शोभत नाही असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले.
तसेच लवकरात लवकर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देऊन परीक्षा रद्द न करण्याबाबतच्या याचिकेवर पुढील सुनावणी एक आठवड्यानंतर होईल असे जाहीर केले.(A hearing on the SSC examination will be held soon)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments