खूप काही

स्विगी कर्मचार्यांसाठी खुशखबर; कर्मचारी करणार आठवड्यातील चार दिवस काम

कर्मचारी आठवड्यातून फक्त चार दिवस करणार काम. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यास कंपनी उपचाराचा पूर्ण खर्च करणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन केले आहे. हॉटेल रेस्टॉरंट देखील बंद आहेत त्यामुळे फक्त हॉटेलमधून फूड होम डिलिव्हरी स्विगी मार्फत चालू आहे. त्यामुळे ऑनलाइन फूड डिलिव्हरी कर्मचारी रोज मेहनतीने आपले काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी आता खुशखबर आहे. फुड ऑर्डर आणि डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक सुरक्षित मोठी घोषणा केली आहे.

कर्मचारी आठवड्यातून फक्त चार दिवस काम करणार. मे महिन्यात स्विगी कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसाचा वर्कविक असणार आहे.याचबरोबर स्विगी कर्मचाऱ्यांसाठी ऍडव्हान्स सॅलरी देखील देण्यात येणार आहे. त्याचबरोबर लोनची सुविधादेखील देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यास किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला कोरोनाची लागण झाल्यास कंपनी उपचाराचा पूर्ण खर्च करणार आहे.(Swiggy announces 4-day work week for employees in May)

आठवड्यातून चार दिवस काम याबाबत कंपनीचे एचआर हेड गिरीश मेनन यांनी कर्मचाऱ्यांना ही माहिती इमेल द्वारे पाठवली आहे. ई-मेलमध्ये असे लिहिले गेले होते की, “तुम्ही स्वतः आठवड्यातील चार दिवस निवडा ज्या दिवशी तुम्ही काम करू शकता आणि उरलेले दिवस तुम्ही घरी आराम करू शकता किंवा कुटुंबाबरोबर, मित्रांबरोबर राहू शकता”.

स्विगी कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यास उपचाराचा पूर्ण खर्च कंपनी देणार असल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यास लगेच मेडिकल सुविधा, हॉस्पिटलमध्ये बेड, आयसीयू, प्लाजमा, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मदत कंपनी करणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments