आपलं शहर

Tauktae Cyclone : तौक्त चक्रीवादळाने मुंबईकरांना दाखवला 2050 चा ट्रेलर, पाहा काय होऊ शकते…

1993 पासून ते 2012 पर्यंत समुद्राचा जलस्तर प्रत्येक वर्षाला दोन-दोन मीटर वाढत असल्याने 2050 पर्यंत मुंबईमधील एक मोठा भाग पाण्याखाली जाईल.

सोमवारी सकाळी चक्रीवादळ मुंबईमध्ये दाखल झाले होते. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले.चक्रीवादळामुळे समुद्राच्या लाटांनी रौद्र रूप धारण केलेले आपल्याला दिसले. परंतु हे येणाऱ्या काळातील एक दृश्य होते. ज्याप्रकारे समुद्राचे पाणी गेटवे ऑफ इंडियाला (gateway of India) पार करून शहरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. ते पाहता पर्यावरण वैज्ञानिकांनी असा निकष लावला आहे की, 2050 पर्यंत मुंबईमधील एक मोठा भाग पाण्याखाली जाईल.

गेटवे ऑफ इंडियाचा (gate way of india) इतिहास
गेटवे ऑफ इंडिया (gateway of India) हे 1924 मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. मुंबई शहर 500 वर्षापूर्वी पोर्तुगीजांच्या हातात होती. 1661 मध्ये जेव्हा पोर्तुगीजांच्या राजकुमारीचे लग्न ब्रिटनच्या राजकुमाराबरोबर झाले. तेव्हा पोर्तुगीजांनी मुंबई भेट म्हणून ब्रिटनला दिली. त्या वेळी इंग्रजांनी समुद्राच्या भोवती काही सीमा बनवल्या होत्या. परंतु त्या सीमा पार करण्यासाठी आता समुद्र उतावळा झालेला पाहायला मिळतो आणि याचीच एक झलक आपल्याला सोमवारी पाहायला मिळाली.(Tauktae Cyclone: ​​Cyclone Tauktae shows Mumbaikars the trailer of 2050, see what can happen …)

समुद्राचा जलस्तर प्रत्येक वर्षाला दोन मीटरने वाढत आहे
अमेरिकेतील पर्यावरण संघटन वैज्ञानिकांनी असे सांगितले की, समुद्राच्या जवळील एक मोठा भाग 2050 पर्यंत पाण्याखाली जाऊ शकतो. त्याचबरोबर गोवामधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन यांनी 2015 मध्ये असा निष्कर्ष काढला की, 1993 पासून ते 2012 पर्यंत समुद्राचा जलस्तर प्रत्येक वर्षाला दोन-दोन मीटर वाढत आहे. वैज्ञानिकांकडून असे समजले आहे की, समुद्राचा जलस्तर कायम वाढत आहे. एकोणिसाव्या शतकात औद्योगिक क्रांतीनंतर जलस्तर वाढण्यात वेग आला. परंतु त्यामुळे येणाऱ्या काळात जलस्तर अजून वाढून मुंबईच्या शहरांमध्ये घुसू शकतो.(The sea level is rising by two meters every year)

समुद्राच्या लाटा तीव्र होण्यामागचे कारण
गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूने काही भिंती बांधण्यात आल्या आहेत. ज्यांने समुद्राचे पाणी अडवले जाते. पावसाळ्यात समुद्राच्या लाटा त्या भिंतीला पार करतात परंतु या चक्रीवादळात असे दृश्य पहायला मिळाले की, समुद्राच्या लाटा इतक्या तीव्र झाल्या होत्या की, असे वाटत होते समुद्राच्या लाटा गेटवे ऑफ इंडियाला पार करून ताज हॉटेलमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमवारी लाटांची आक्रमकता इतकी भयावह होती की, रस्त्यांवरचे बॅरिकेट सुद्धा कोलमडून पडले होते.(The reason behind the intensification of sea waves)

सोमवारची ही दृश्य येणाऱ्या काळात पुन्हा पुन्हा पाहायला मिळू शकतात आणि याच्या मागचं कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग, मुंबईचा इतिहास आणि भूगोल.पूर्वी बंगालच्या खाडीमध्ये सतत चक्रीवादळ येत होते. परंतु आता अरबी समुद्रात देखील याची वारंवारता वाढत आहे. मागील वर्षी निसर्ग चक्री वादळ आले होते तर यावर्षी तोक्ते चक्रीवादळ आले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments