आपलं शहर

Tauktae Cyclone : चक्रीवादळाचा धुमाकुळ, वाचा मुंबईतल्या नुकसानाची संपूर्ण माहिती, एका क्लिकवर…

तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईत ८१२ झाडे पडली, यापैकी ७०% झाडे विदेशी असा पालिकेचा दावा

 

मुंबईमध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे(tauktae cyclone) अनेकांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे कोलमडून पडली. किनारपट्टी लगतच्या भागात तोक्ते चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वाऱ्याचा वेग तब्बल 114 किलोमीटर प्रतितास पेक्षा अधिक दिसून आला. याच वाऱ्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील झाडे पडली. या क्षेत्रातील एखादे झाड तोडायचे असले तरीसुद्धा पालिकेची परवानगी घ्यावी लागते. परंतु वादळामुळे महानगरपालिका क्षेत्रातील 812 झाडे पडली. त्यातील 504 झाडे खाजगी क्षेत्रातली असून 308 झाडे सार्वजनिक परिसरातील होती. पालिकेच्या नाकर्तेपणामुळे वृक्षांचा बळी गेला अशी भावना वृक्षप्रेमींनी व्यक्त केली.

तौक्त चक्रवादळामुळे(Tauktae cyclone) अनेकांचे नुकसान

महाराष्ट्रात आधीच कोरोनाने थैमान घातले होते त्यात चक्रीवादळाने अजून भर घातली. मुंबईमध्ये वाऱ्याचा वेग 120 किलोमीटर प्रतितास होता त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांवरील झाडे वाऱ्याच्या वेगाने पडली . अनेक घरे पडली, घरांची कौले उडाली, सतत येणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, समुद्राच्या लाटांचा वेग वाढला अशा अनेक प्रकारच्या घटना घडल्या.

मुंबई विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल
तौक्ते वादळामुळे 2,364 आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यालयात झाड व फांद्या पडण्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून महानगरपालिके विरुद्ध नाराजी व्यक्त करण्यात आली. वादळाने ज्या प्रकारे कोकणात नुकसान होते त्याचप्रकारे या वर्षी मुंबईत देखील नुकसान झाले.

महानगरपालिकेतील 504 झाडे आणि खाजगी परिसरातील 308 झाडे पडली. त्याचबरोबर एकूण 812 झाडे पडली. यामध्ये 70 टक्के झाडे विदेशी प्रजातींची होती. महानगरपालिका मुंबई विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करते. बाकीची उरलेली झाडे वादळात कोलमडून पडतात. वादळाच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे मुळासकट उपटून निघाली. त्यामुळे काँक्रिटीकरण थांबवणे गरजेचे आहे. कारण जर काँक्रिटीकरण थांबले नाही तर मुंबईचा धोका आणखीन वाढेल.(Tree felling in the name of Mumbai development)

1454 झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना आले समोर
तौक्तेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 2,364 ठिकाणांहून आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यालयात झाडाच्या फांद्या पडण्याच्या तक्रारी दाखल झाल्या. या व्यतिरिक्त वादळाच्या प्रभावामुळे 1,454 झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.गेल्या दोन वर्षात हजार पेक्षा जास्त झाडे वादळामुळे पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 2020 मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे देखील 355 झाडे पडली होती.(1454 Incidents of falling tree branches came to the fore)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments