आपलं शहर

Tauktae Cyclone in Mumbai चक्रीवादळाचा मुंबईकरांना फायदा, अनेक ठिकाणी पाण्याची समस्या मिटली

चक्रीवादळाने झालेल्या जोरदार पावसामुळे तलावातील पाण्यात वाढ

मुंबईत तौक्ते चक्रीवादळामुळे(tauktae cyclone) मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आले. सातत्याने पडणाऱ्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, तर वार्‍याच्या वेगाने झाडे कोलमडून पडली. अनेकांच्या घरांचे देखील नुकसान झाले. परंतु चक्रीवादळात झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना खुशखबर मिळाली आहे.

पावसामुळे तलावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ
या चक्रीवादळात मुंबईत झालेल्या पावसाने मुंबईतील 7 पैकी 6 तलावांमध्ये चार दिवसात 640 मिली मीटर एवढा पाऊस नोंदविण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे तलावाच्या पाण्याची पातळी वाढली. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये दरवर्षी पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. अनेक ठिकाणी लोकांना पाण्यासाठी काही किलोमीटर चालत जावे लागते. परंतु यावर्षी तौक्ते चक्रीवादळामुळे पाण्याचा पुरेसा साठा निर्माण झालेला आहे.(Increase in the water level of the lake due to rains)

मुंबईकरांसाठी ही खूशखबर
यावर्षी मुंबई व इतर ठिकाणी पाणीकपातीची वेळ येणार नाही. गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे अजून तरी मुंबईवर पाणीकपातीची वेळ आली नव्हती. त्यामुळे मुंबईत जे नुकसान झालं त्यानंतर आज मुंबईकरांसाठी वादळानंतर आलेली ही खुशखबर असल्याचे बोलले जाते.(This is good news for Mumbaikars)

चार दिवसांमध्ये सर्वाधिक पाऊस विहार आणि तुळशी तलावात झाला
महानगरपालिकेतील 7 पैकी 6 तलाव क्षेत्रात झालेल्या पावसामुळे तलावातील पाणी साठ्यात अजून भर पडली. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. चार दिवसांमध्ये सर्वाधिक पाऊस हा विहार आणि तुळशी तलावात झाल्याची नोंद केली आहे. भातोसा येथे 29 मिली मीटर, तानसा 59 मिली मीटर, हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय 62 मिली मीटर, मोडक सागर 102 मिली मीटर आणि सर्वात जास्त तुळशी तलाव क्षेत्रात 178 मिली मीटर पावसाची नोंद झाली.(The highest rainfall in four days was recorded at Vihar and Tulsi lakes)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments