घटना

Tauktae cyclone update तौक्ते चक्रीवादळामुळे किती नुकसान? अनेकांचा मृत्यू, अनेक घरं उध्वस्त

चक्रीवादळामुळे साधारणत: 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर 18 जण जखमी झाल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती विभागाने दिली आहे.

Tauktae cyclone update सोमवारी (17 मे रोजी) महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळामुळे साधारणत: 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर 18 जण जखमी झाल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती विभागाने दिली आहे. राज्याच्या विविध भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तर अनेक किनारपट्ट्या उध्वस्त झाल्या आहेत. (Tauktae cyclone update How much damage due to Tauktae cyclone)

मुंबईत मृत्यू नाही
गोवा, महाराष्ट्र, गुजरात रा राज्यांमध्ये थैमान घालणाऱ्या तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक घरांचं नुकसान झालं असलं तरी कोणतीही जिवीत हानी झाली नाही. कोणाचाही तौक्ते चक्रीवादळामुळे मृत्यू झालेला नाही. मात्र वादळामुळे पाच लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. (No death in Mumbai)

मृत्यूंचे तांडव
रायगडमध्ये तौत्के चक्रीवादळामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. ठाण्यात तीघांचा चक्रीवादळामध्ये सापडून मृत्यू झाला आहे, तर एकजण जखमी झाला आहे. पालघरमध्ये दोन मृत्यूची नोंद झाली आहे. (death due to storms)

विद्युत तारांच्या संपर्कात आल्यामुळे रत्नागिरी येथे दोन जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. जळगावमध्ये अंगावर झाड पडल्याने दोन मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

सिंधुदुर्गमध्ये एकाचा मृत्यू आणि दोन जखमींची नोंद आहे. माणसांप्रमाणे सिंधुदुर्गात इतर प्राण्यांचाही मृत्यूही झाल्याची नोंद आहे. रत्नागिरीतील चार, रायगडमधील दोन आणि पालघरमधील एका प्राण्याचा तौक्ते चक्रीवादळामुळे मृत्यू झाला आहे.

अनेक घरांचं नुकसान
राज्यात एकूण 3772 घरांच नुकसान झालं आहे, तर 11 घरे पूर्णपणे पडली आहेत. रायगडमध्ये सर्वाधिक 1788 इमारती बाधित झाल्या आहेत, त्यानंतर रत्नागिरीतील 1028, सिंधुदुर्गात 511, ठाण्यात 172, पालघरमध्ये 138, पुण्यात 101, कोल्हापुरात 27, साताऱ्यामध्ये 6 आणि मुंबईतील 5 इमारतींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. (damage to many homes)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments