आपलं शहर

Tauktae Cyclone Update : Video | चालत्या लोकलवर कोसळलं झाडं, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा व्हिडीओ

सध्या राज्यात तौत्के चक्रीवादळाचा धोका जाणवत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Tauktae Cyclone Update : गोव्यातून पुढे सरकत असलेलं तौत्के चक्रीवादळ मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर अशा ठिकाणी रौदरुप धारण करत आहे. तौत्के चक्रीवादळाचा धोका मुंबईतून पुढे सरकर गुजरातच्या दिशेने वाहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. (Trees fell on the moving local, passengers panicked)

मुंबईला धोका नाही
शास्त्रज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नाही, मात्र हवामान विभागाने मुंबईतील अनेक ठिकाणी आणि परिसराला ऑरेज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत जरी वादळ धडकणार नसलं तरी मुंबईतल्या अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहत आहेत, सोबतच अनेक ठिकाणी जोराचा पाऊसही येत आहे. (Mumbai is not in danger)

मध्यरात्रीपासूनच वादळाला सुरुवात
मध्यरात्रीपासूनच मुंबईत अनेक ठिकाणी वादळाने हजेरी लावली आहे. अनेकठिकाणी वाऱ्यासह जोरदार पाऊस येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असा इशारा हवामान खात्यासह मुंबई प्रशासनाने दिला आहे. (Tauktae Cyclone Update in Mumbai)

मुंबईपासून 150 किमी अंतरावर वादळ
राज्यावर आलेलं अस्मानी संकट म्हणजे तौत्के चक्रीवादळ हे मुंबईपासून 150 किमी लांबून वाहणार आहेत. दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा उसळतानादेखील पाहायला मिळत आहेत. (storm at a distance of 150 km from Mumbai)

वादळामुळे 132 झाडांची पडझड
मुंबईत जरी तौत्के चक्री वादळ येत नसलं तरी त्याच्या परिणाम अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. तौत्के वादळामुळे मुंबईतील दोन तासात 132 झाडे उन्मळून पडल्याचं चित्र आहे. रेल्वेच्या लोको लाईनवरदेखील झाडं पडल्याने लोकल खोळंबल्याचं चित्र निर्माण झालं आहे. (132 trees fell due to storm)

लोकलच्या ओव्हरहेड वायरवर कोसळलं झाडं
लोकलल जात असताना अचानक लोकलला करट सप्लाय करणार्या ओव्हरहेड वायरवर झोड कोसळलं आहे. तौत्के चक्रीवादळामुळे हे झाड कोसळलं आहे. घाटकोपरहून विक्रोळीला लोकल येत असताना ही घटना घडली. या घटनेमुळे लोकलमध्ये असलेल्या प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती. (A fallen tree on a local overhead wire)


लोकल सेवा विस्कळीत
ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याने करंट सप्लाय काही कालावधीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर लोकल प्रशासनाकडून हे झाड हटवून संपूर्ण लोकलसेवा पुर्ववत करण्याच आल्याचं लोकल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. (disrupting local service)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments