आपलं शहर

Tauktae Mumbai Navy Rescue News: समुद्रात हरवलेले लोक अजूनही असू शकतात जिवंत, पाहा काय आहे कारण

बार्ज पी-305 वर उपस्थित असणाऱ्या 273 लोकांपैकी 184 लोकांना वाचवण्यात यश आलेले आहे. 

तौक्ते चक्रीवादळात (Tauktae cyclone) अरबी समुद्रामध्ये बुडालेले बार्ज पी-305 रेस्क्यू मिशन अजूनही चालूच आहे. बार्जवरील गायब असणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू कमी होत असून बार्ज पी-305 वर उपस्थित असणाऱ्या 273 लोकांपैकी 184 लोकांना वाचवण्यात यश आलेले आहे.

खराब वातावरणामुळे बचाव कार्यात अडचणी
बचावकार्य करणाऱ्यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे त्यांना बचावकार्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अजूनही समुद्र अशांत आहे. हवेच्या वेगामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहे. तिथल्या निरीक्षकांनी सांगितले की, समुद्रातील होणाऱ्या हालचालीमुळे बार्जवरून लोकांना रेस्क्यू जहाजांमध्ये ट्रान्सफर करण्यात खूप अडचणी आल्या. हे काम अतिशय आव्हानात्मक होते.(Tauktae Mumbai Navy Rescue News: Lost people at sea can still be alive, see what is the reason)

लाइफ जॅकेटमुळे गायब लोक ठीक असण्याची शक्यता
पी-305 वरील उपस्थित सदस्यांनी लाईफ जॅकेट(life jacket) घातले होते. त्यामुळे ते बुडू शकत नाहीत. डी जे शिपवरील सदस्यांचे म्हणणे आहे की, जे लोक गायब आहेत ते लोक कदाचित अजूनही पाण्यात पोहत असतील. कारण आतापर्यंत जितक्या लोकांना वाचवण्यात आले आहे त्या लोकांनी लाईफ जॅकेट घातले होते. त्यामुळे गायब असलेल्या लोकांनीदेखील लाइफ जॅकेट घातल्यामुळे त्यांच्या जगण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हेलिकॉप्टरद्वारे(helicopter) देखील शोध घेतला जात आहे.(Life jackets make missing people more likely to recover)

गेल्या चार वर्षांमध्ये हे बचावकार्य सर्वात जास्त आव्हानात्मक
हेलिकॉप्टर मार्फत बार्ज पी-305 मधील बहुतेक जवानांना वाचवण्यात यश आले आहे. वाचवण्यात आलेल्या सदस्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. व्हाइस एडमिरल एम. एस. पवार(M. S. Pawar) यांनी प्रसारमाध्यमांना असे सांगितले की, गेल्या चार वर्षां मधील हे सर्वात आव्हानात्मक आणि कठीण बचावकार्य आहे. त्याचबरोबर कोरोनासंदर्भात बोलताना त्यांनी असेही सांगितले की, सर्व सदस्यांना कोरोना लसीचा डोस दिला गेलेला आहे.

ओएनसीजीच्या(ONCG) म्हणण्यानुसार पी-305 बार्ज चक्रीवादळामुळे लंगर मधून घसरले आणि अनियंत्रित झाल्यामुळे ते समुद्रात बुडाले. हे एक असे बार्ज आहे ज्यात सामान ठेवले जाते त्यामुळे यात कोणतेही इंजिन लावले जात नाही.(This rescue is the most challenging in the last four years),

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments