आपलं शहर

Maharashtra Unlock News : ठाकरे सरकारचा अनलॉक प्लॅन, 5 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या काय सुरु काय बंद?

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने मुख्यमंत्री उद्धव सरकार अनलॉकचा विचार करत आहेत. ठाकरे सरकारकडून अनेक निर्बंधांमध्ये शिथीलता आणण्याची शक्यता आहे.

Maharashtra Unlock News : माहितीनुसार, महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने निर्बंध हटविण्याबाबत चर्चा आहे. सर्व गोष्टी योजनेनुसार राहिल्यास आणि रुग्णांचे कमी असल्यास 1 जूनपासून अनलॉक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या अनलॉक संबंधित चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. तरीही अनलॉक करण्याचं नियोजन असल्यास सरकारकडून काही मुद्द्यांना समोर केलं जाईल.

कोरोना रुग्णांची संख्या घटली…

गेल्या अनेक दिवसांपासून दरदिवशी दीड हजाराहून कमी रुग्णसंख्या रोज समोर येत असल्याने सरकारसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. अशाचप्रकारे जर रुग्णांच्या वाढीमध्ये घट निर्माण झाली तर 1 जूननंतर लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्याची शक्यता आहे. (The number of corona patients decreased)

2. 10 वार्डमध्येच कंटेनमेंट झोन
मुंबईतील 24 वॉर्डांपैकी आता केवळ 10 वॉर्डमध्ये कंटेन्मेंट झोन शिल्लक आहेत, तर 14 वॉर्ड कंटेन्मेंटमुक्त झाले आहेत. सोबतच 7 वार्डमध्ये एकही मायक्रो कंटेनमेंट झोन नाही. मुंबईत फक्त 44 कंटेनमेंट झोन अॅक्टिव्ह आहेत, त्यामध्ये सुमारे 2.33 लाख लोक राहतात, तर कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर2747 कंटेनमेंट झोन मुक्त करण्यात आले होते. (Containment zone within 10 wards only)

3. चार टप्प्यात अनलॉक होण्याची शक्यता
अनलॉक प्रक्रिया महाराष्ट्रात चार टप्प्यात घेता येईल. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात भाजीपाल्यासह इतर गोष्टी सुरु होतील, पावसाळा येण्याआधीदेखील अनेक स्वच्छता, नालेसफाई, शेतीची कामे अशा कामांना परवाणगी देयात येईल, सोबतच शेतीच्या संबंधीत अनेक दुकानांनाही सुरु करण्याची परवाणगी देण्यात येईल. (Possibility to unlock in four stages)

दुकानांचे सुरु ठेवण्याचे तास वाढू शकतात
राज्यात दुकान सुरु ठेवण्याची जी वेळ सध्या दिली आहे, त्या वेळेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या दुकानांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 11 या वेळेत उघडण्याची परवानगी आहे. दुकानांमधील वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढवता येईल, अशी माहिती आहे. शॉप अनलॉकसह एसओपी देखील तयार केल्या जातील जेणेकरून संक्रमणाचा प्रसार पुन्हा वाढणार नाही. (Shopping hours may increase)

4. तिसऱ्या टप्प्यात बार-रेस्टॉरंट उघडण्याची शक्यता
तिसर्‍या टप्प्यात सरकार रेस्टॉरंट्स, बार आणि वाइन शॉप्स उघडण्यास परवानगी देऊ शकते. त्यांच्यासाठी एसओपी तसेच सामाजिक अंतर अंमलबजावणीसाठीचे उपाय असतील. जे रेस्टॉरंट्स उघडणार आहेत, अनेक नियमांचे पालन करावेच लागेल. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दुकाने बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. अशी अपेक्षा आहे की पुढील महिन्यात सरकार दुकाने उघडण्याचा निर्णय घेऊ शकेल. (The possibility of opening a bar-restaurant in the third phase)

5. चौथ्या टप्प्यात धार्मिक स्थळे उघडतील
जर गोष्टी ठीक राहिल्या तर चौथ्या टप्प्यात उर्वरित निर्बंध हटविले जाऊ शकतात. चौथ्या टप्प्यात, स्थानिक सेवा आणि धार्मिक स्थळे उघडण्यासही सरकार मान्यता देऊ शकते. त्याशिवाय ज्या जिल्ह्यात लॉकडाउन किंवा कडक निर्बंध घातले गेले आहेत तेथे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्णय घेण्याचे आदेश दिले जातील. (In the fourth phase, religious places will be opened)

मुख्यमंत्री अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्टपणे सांगितले होते. कोरोना नियंत्रणात आल्यामुळे महाराष्ट्रातील अनलॉकिंग प्रक्रियेला वेग आला होता. पूर्वीच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत होती. कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी होत आहे, पण अनलॉकसंदर्भात काहीही बोलणार नाही. असं स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments