खूप काही

Mumbai News : प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आलेली लोकल, पाहा कोणचा आहे हा आवाज

कित्येक वर्ष झाली तरी देखील रेल्वे संबंधित माहिती देताना आपल्याला ऐकू येणारा आवाज आहे तरी कोणाचा? ही घोषणा करणारी महिला नक्की आहे तरी कोण?

रेल्वे स्टेशनवर अनेकदा तुम्ही ‘प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आलेली लोकल’ हे वाक्य नक्कीच ऐकले असेल. हा आवाज ऐकू येताच स्टेशनवरील लोक सतर्क होऊन ती घोषणा ऐकतात तर अनेकांची ट्रेन पकडण्यासाठी धावपळ सुरू होते. कित्येक वर्ष झाली तरी देखील हाच आवाज रेल्वे संबंधित माहिती देताना आपल्याला ऐकू येतो. परंतु ही घोषणा करणारी महिला नक्की आहे तरी कोण?

हा आवाज नक्की कोणाचा?
या गोड आवाजाच्या महिलेचे नाव आहे सरला चौधरी. एकूण 28 वर्ष रेल्वे स्टेशनवर त्यांचा आवाज ऐकू येत आहे. परंतु आता त्या रेल्वेमध्ये अनाऊन्सरच्या पदावर नाहीत तरीदेखील हाच आवाज आपल्याला ऐकू येतो. त्या आता काम करत नाहीत तरी देखील आपल्याला हा आवाज ऐकू येतो याचे कारण असे की, आधी त्या रोज स्वतः घोषणा करीत होत्या. परंतु त्यांचा आवाज रेकॉर्ड केला गेला आहे आणि तीच रेकॉर्डिंग आजही आपल्याला रेल्वे स्टेशन वर ऐकायला मिळते.(That Voice Behind Mumbai’s Local Train Announcements?)

सरला यांचे काम कसे होते
सरला चौधरी यांनी 13 मार्च 1982 मध्ये अनाऊन्सर पदावर काम करण्यास सुरुवात केली होती. त्या काळात संगणक उपलब्ध नसल्याने त्यांना खूप कसरत करावी लागत असे. प्रत्येक रेल्वे स्टेशनवर जाऊन येणाऱ्या ट्रेन बद्दल त्यांना घोषणा करावी लागत असे. त्याचबरोबर त्यांना इतर भाषांमध्ये देखील अनाउन्समेंट करावी लागत असे. त्यानंतर ही जबाबदारी ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीमला देण्यात आली.(How Sarla works)

वेळ घालवण्यासाठी ही नोकरी करण्याचा निर्णय घेतला
सरला चौधरी यांनी एका मुलाखतीत असे सांगितले की, रेल्वेमध्ये नोकरी करण्याबाबत मी काही ठरवले नव्हते. परंतु एकदा माझ्या वडिलांनी सांगितले की रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांना तीन महिन्यासाठी अनाउन्समेंटमध्ये काम करण्याची संधी आहे. त्यावेळी वेळ घालवण्यासाठी मी ही नोकरी करण्याचा निर्णय घेतला. कुर्ला कारशेडमध्ये आमच्या आवाजाची परीक्षा घेण्यात आली होती. आवाज ऐकून काही लोकांना भरती केलं गेलं. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या पहिल्या अनाउन्समेंटचा आवाज सरला चौधरी यांचा होता.(Decided to do this job for timepass)

अनाउन्समेंट करताना बघण्यासाठी लोक करीत असे खिडकीबाहेर गर्दी
सरला चौधरी यांनी सांगितले की, अनाउन्समेंट करत असताना लोक खिडकीच्याबाहेर त्यांना बघण्यासाठी गर्दी करत असत. काही जण त्यांच्या लहान मुलांना दाखवण्यासाठी आणत असे. नोकरी तीन महिन्यांसाठी होती परंतु या अनाउंसमेंटला लोकांनी खूप प्रेम आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला म्हणून तीन महिन्याचा कालावधी वाढवला गेला.(People used to crowd outside the window to see the woman making the announcement)

जेव्हा सरला यांच्या पतीने पहिल्यांदा ऐकली अनाउन्समेंट
सरला यांचे पती सुभाष यांनी सांगितले की, एकदा ते विक्रोळीला गेले असताना त्यांनी रेल्वेची अनाउन्समेंट ऐकली. ट्रेन बद्दल अनाउन्समेंट ऐकू येताच लोकांनी धावपळ करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना सरला यांचा पती असण्याचा जास्त अभिमान वाटतो.(When Sarla’s husband first heard the announcement)

आजही ही अनाउन्समेंट रेल्वे स्टेशनवर कशी ऐकू येते?
जेव्हा 1991 मध्ये संगणकाचा वापर सुरू झाला तेव्हा त्यांचे आवाज रेकॉर्ड केले गेले. त्यामुळे कोड नंबर टाकला की अनाउन्समेंट होत असे. सरला चौधरी यांनी असे सांगितले की, जेव्हा प्लॅटफॉर्मवर गेल्यावर स्वतःचाच आवाज ऐकू येतो तेव्हा खूप जास्त आनंद मिळतो. नोकरी सोडल्यानंतर त्यांचा आवाज स्टॅण्डबाय मोडवर ठेवण्यात आला. त्यामुळे आजही ही त्यांची अनाउन्समेंट आपल्याला ऐकायला मिळते.(How can the announcement be heard at the railway station even today)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments