भुक्कड

Raw Onion With Food : दररोज जेवणाबरोबर कच्चा कांदा खाल्याणे होतात हे फायदे…

कच्चा कांदा खाण्याने शरीराला होतात अनेक फायदे

Benefits Of Raw Onion : कांदा हा भारतीय आहारात एक सामान्य भाग आहे. याचा उपयोग करी, सँडविच, सूप, लोणचे आणि बरेच नवनवीन पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. भारतात कच्चा कांदा हा जास्त प्रमाणात कोशिंबीर स्वरूपात खाल्ला जातो. उन्हाळ्याच्या काळात बरीच लोक कच्चा कांदा खाण्यासाठी प्रोत्साहित करतात कारण ते आपल्याला शरीराला थंड ठेवते आणि आरोग्यासाठी त्याचे बरेच फायदे आहेत. आपल्या आहारातील रोजचे जेवण चवदार आणि पौष्टिक बनविण्यासाठी कच्च्या कांद्याचा त्यामध्ये समावेश करण्याचा एक सोपा मार्ग आहे. अलीकडेच न्यूट्रिशनिस्ट आणि जीवनशैली प्रशिक्षक ल्यूक कौटिन्हो यांनी इंस्टाग्रामवर आपल्या अनुयायांना कच्चा कांदा खाण्यामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी सांगितले आहे.(Health Benefits Of Raw Onion)

कांदा(Onion) हा कूर्सेटीनचा समृद्ध एक स्रोत आहे जो काही पदार्थांमध्ये एक नैसर्गिक रंगद्रव्य मनाला जातो . कौटिन्होच्या मते, कांद्यामध्ये जे क्युरेसेटिन असते ते रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. कूर्सेटीन हे शरीरावरील सूज कमी करण्यासाठी, बुध्दी वाढवण्यासाठी, तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि असेच अनेक आरोग्य फायदे पुरवण्यासाठी ओळखले जाते.

विशेष गोष्टी :

कांदा रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करतो.
कांदा खाल्ल्याने पाचक प्रणाली निरोगी राहते.
कांदा एलर्जी असलेली लक्षणे कमी करण्यास मदत करतो.

कांदे खाण्याचे इतर फायदे(Other Benefits Of Eating Onion)

क्वेरसेटिन व्यतिरिक्त कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम असतात. पोटॅशियमच्या उपस्थितीरक्तदाब कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी कांदे फायदेशीर ठरतात. कांदा आपल्याला अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील देऊ शकतो. कांदा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. जे मधुमेह आणि मधुमेह-पूर्व मधुमेह असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments