IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज…
आयपीएलचे पुढील सामने यूएई मध्ये खेळले जाणार.

IPL in UAE : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा सीजन मध्येच स्थगित करण्यात आलेला होता. पण आता तोच स्थगित झालेला सीजन बीसीसीआयकडून(BCCI) सुरू होण्याच्या मार्गावर आहे. तर जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलचे सामने पुन्हा खेळवले जाणार. आयपीएलचे उरलेले 31 सामने आता यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयने हा निर्णय घेऊन तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं आहे. बीसीसीआयला आता अतिशय कमी वेळेत उर्वरित सामन्यांचं आयोजन करावं लागणार आहे. कमी वेळेत स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणं हे बीसीसीआयच मोठं आव्हान असणार आहे. (IPL has been moved to UAE for IPL 2021 Season BCCI Vice president Rajeev Shukla)
BCCI ची मोठी घोषणा :
भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) आज विशेष मीटिंगचे (Special Genral Meeting) आयोजन केलं होते. बीसीसीआयच्या आजच्या बैठकीत भारतातील कोरोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आल्या. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आहेत.
IPL has been moved to UAE for this season: Vice-President BCCI Rajeev Shukla to ANI pic.twitter.com/wqEukw6KGP
— ANI (@ANI) May 29, 2021
बीसीसीआयने टाळले तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान :
आयपीएलचा 14 वा हंगाम पुन्हा सुरु झाला नसता तर बीसीसीआयला सुमारे 3000 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागेल. कारण अनेक कंपन्याची स्पॉन्सरशीप ही फॅक्त आयपीएल स्पर्धेलाच होती. त्यामुळे बीसीसीआयला कोणत्याही परिस्थितीत 14 वं सत्र पूर्ण करायचं होतं. त्यामुळे बीसीसीआयने मोठा निर्णय घेत मोठा आर्थिक तोटा टाळण्यासाठी उर्वरित सामन्यांचं आयोजन यूएईमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.
30 दिवसात 31 सामने खेळवणार?
भारताचा इंग्लंड दौरा 18 जूनला सुरु होऊन 14 सप्टेंबरला संपणार आहे. भारत-इंग्लंड मध्ये कोणताही बदल झाला नाही तरी टी – 20 वर्ल्डकपपूर्वी बीसीसीआयकडे एक महिन्याची (15 सप्टेंबर – 15 ऑक्टोबर) विंडो असेल. या 30 दिवसांत भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना ब्रिटनहून युएईला आणण्यासाठी संपूर्ण दिवस लागणार आहे. बाद फेरीसाठी 5 दिवस बाजूला ठेवावे लागतील. अशा परिस्थितीत बीसीसीआयकडे 27 सामने पूर्ण करण्यासाठी 24 दिवसांचा कालावधी असेल. या विंडोमध्ये 8 शनिवार-रविवार आहेत. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक शनिवार व रविवारी दोन सामने खेळवले तर महिन्यात 16 डबल हेडर सामने खेळवले जाऊ शकतात. उर्वरित 19 दिवसांत 11 सामने खेळवता येतील.
आयपीएलचं आयोजन हे यूएईमध्येच का ??
पहिलं कारण – सप्टेंबरमध्ये युएईचे हवामान खूप चांगले असते. तिथे सप्टेंबरमध्ये पावसाचा कोणताही धोका नाही.
दुसरं कारण – युएईमध्ये इतर देशांच्या तुलनेत कमी खर्चात IPL स्पर्धा पार पडणार आहे.
तिसरं कारण – आयपीएलच्या स्पर्धा यापूर्वीदेखील युएईमध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत.