खूप काही

हकीमी संस्था करते रुग्णांच्या उपचारापासून ते अंतिम विधी पर्यंतची सर्व मदत..

हकीमी संस्था कोरोना रुग्णांच्या उपचारापासून ते कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचे दफन करेपर्यंत करते मदत..

पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्यामुळे मुंबईमधील अनेक लोकांचे खाण्यापिण्याचे हाल सुरू आहेत. काम बंद असल्याने कमाई देखील बंद आहे. त्यामुळे अनेक लोकांकडे खाण्यासाठी देखील पैसे नाहीत. परंतु अशा लोकांच्या मदतीसाठी अनेक लोक स्वतःहून समोर येतात. गरजू लोकांना अन्नधान्य पुरवठा करतात. यातीलच एक हकीमी संस्था आहे.

हकीमी एक सामाजिक संस्था आहे. ही संस्था कोरोना रुग्णांच्या उपचारापासून ते कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचे दफन करेपर्यंत मदत करतात. महमूद हकीमी यांनी सांगितले की, यापूर्वी आम्ही अनेक अडचणी पार केल्या आहेत. आमच्यावर अशी वेळ आली आहे की, घरच्यांना देखील भेटण्यासाठी आम्हाला वेळ नव्हता. तेव्हापासूनच गरजू लोकांना मदत करायचे ठरवले.(The hakimi organization does all the help from the treatment of the patient to the last rites)

मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाली. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेक लोकांचे काम बंद झाले. काम बंद असल्याने लोकांवर उपाशी राहायची वेळ आणि तेव्हा महमूद हकीमी आणि त्यांच्या टीमने मिळून लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतला.

हकीमी आणि त्यांची टीम स्वतःच्या खर्चाने गरजू लोकांना सामान अन्न धान्य आणून देते. ताप, सर्दी, खोकला यासाठीदेखील लोक दवाखान्यात जायला घाबरत होते. त्यामुळे हकीमी यांनी त्यांच्या डॉक्टर मित्राची मदत घेऊन अनेक भागांमध्ये मेडिकल कॅम्प सुरू केले. अगदी स्वस्तात लोकांवर उपचार केला गेला. त्यांनी सांगितले की, कोरोनामुळे लोक स्वतःच्या कुटुंबातील लोकांच्या अंतिम विधी साठी देखील घाबरत होती. अशावेळी आमची टीम त्यांच्याबरोबर उभी राहिली. अंतिमविधी साठी देखील आमच्या टीमने लोकांची मदत केली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments