Is IPL Cancelled? पुन्हा IPL सुरु होणार? पाहा काय आहे व्हायरल चर्चांमागे सत्य…
कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी बीसीसीआयकडून प्रयत्न सुरु.

IPL : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा सीजन मध्येच स्थगित करण्यात आलेला होता. पण आता तोच स्थगित झालेला सीजन बीसीसीआयकडून(BCCI) सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आयपीएल संगामधील काही खेळाडू बायोबबलमध्ये असूनही करोना संक्रमित झाले. करोणाची परिस्थिती आता सावरायला लागल्यामुळे आयपीएल चे पुढील सामने लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय बीसीसीआय(BCCI) ने घेतला आहे.त्यानंतर आता बीसीसीआयने(BCCI) इंग्लंड क्रिकेट बोर्डाला पत्र लिहिले असून आयपीएल खेळण्यासाठी वेळ मिळावा म्हणून कसोटी मालिका निर्धारित वेळेच्या एक आठवडा आधी खेळवली जावी अशी विनंती केली आहे.(IPL Cricket)
बीसीसीआयने (BCCI)इंग्लड क्रिकेट बोर्डाला लिहिलेल्या पत्रामध्ये असे लिहिले आहे की भारत आणि इंग्लंड मधील पाच सामन्यांची कसोटी मालिका ही एक आठवडा आधीच खेळवली जावी . तसेच नियोजित वेळेनुसार, 4 ऑगस्टला पहिली कसोटी केली जाणार आहे. बीसीसीआयच्या(BCCI) मागणीवर इंग्लंड बोर्डाकडून कोणतेही उत्तर आलेले नाही.
सात सप्टेंबर पर्यंत ही कसोटी मालिका संपावी अशी अपेक्षा बीसीसीआयने(BCCI) केली आहे, जेणेकरून ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या t20 वर्ल्ड कप च्या आधी खेळाडूंना आयपीएल खेळण्याची संधी मिळेल. सध्याच्या नियोजित वेळेनुसार 14 सप्टेंबरला कसोटी मालिका संपणार आहे. त्यामुळे आयपीएल लवकरात लवकर सुरू होण्याच्या मार्गावर आहे.