Mumbai Petrol Rate : पेट्रोलच्या किंमतीने पार केली 100, तर डिझेल गेलं 90 पार
गुरुवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलची किंमत 100.4 असून डिझेलची किंमत प्रतिलीटर 91.17 रुपये होती.

राज्यातील इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातील तेल कंपन्यांनी नुकतेच पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. विविध शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 18 ते 25 पैसे प्रतिलीटर तर डिझेलच्या किंमतीत 28 ते 32 पैसे प्रतिलीटर वाढ झाली आहे.
तसेच मुंबईमध्ये प्रतिलीटर पेट्रोलसाठी शंभर रुपयाहून अधिक मोजावे लागत आहेत. गुरुवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलची किंमत 100.4 असून डिझेलची किंमत प्रतिलीटर 91.17 रुपये होती. तसेच मंगळवारी देखील किंमतीत वाढ करण्यात आली आहे. मात्र बुधवारी हेच दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. तर दुसऱ्या दिवशी किंमतीत वाढ झाल्याचेही दिसले.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढ उतार असल्याने याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशालावर पडत आहे. अनेकांनी वाहनांऐवजी सायकल चालविण्यास सुरुवात केली आहे. तरीसुद्धा पेट्रोल शंभरी पार केले म्हटल्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एप्रिल महिन्यात इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नसून, मे महिन्यात पेट्रोलच्या दरात 3 रुपये 30 पैसे आणि डिझेलच्या किमतीत 3 रुपये 85 पैसे वाढ झाली आहे
जिल्ह्यातील पे
Domestic petrol and diesel prices vary across states due to value added tax (VAT). #PetrolDieselPrice #DieselPrice #PetrolPrice https://t.co/H2rCrXRSFy
— CNBC-TV18 (@CNBCTV18News) May 28, 20 :
जिल्ह्यातील पेट्रोल दराची यादी
List of petrol rates in the district:
जिल्हा पेट्रोल दर.
अमरावती 100.49
औरंगाबाद 100.95
भंडारा 100.22
बुलढाणा 100.29
गोंदिया 100.94
हिंगोली 100.96
जळगाव 100.86
जालना 100.98
नंदुरबार 100.45
उस्मानाबाद 100.15
सातारा 100.12
वर्धा 100.10
रत्नागिरी 100. 53