फेमस

IPL 2021 : आयपीएल 2021 च्या निलंबनामुळे खेळाडूंच्या बँक बॅलन्सवरही होणार परिणाम…

आयपीएल 2021 च्या निलंबनामुळे बीसीसीआयच्या प्रसारण आणि प्रायोजित रकमेमध्ये दोन हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा तोटा होण्याची शक्यता...

कोविड -19 प्रकरणांमुळे 4 मे रोजी आयपीएल 2021 अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदाबाद आणि नवी दिल्ली येथील खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी यांच्यात कोविड -19 चे अनेक प्रकरण उघडकीस आली असल्याने बीसीसीआयला आयपीएल पुढे ढकलणे भाग पडले आहे . या निर्णयामुळे बीसीसीआय तसेच संघाचे मालक आणि खेळाडू यांच्या कमाईवरदेखील परिणाम होणार. प्रसारण आणि प्रायोजित रकमेमध्ये बीसीसीआयला दोन हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा तोटा होऊ शकतो. त्याचबरोबर खेळाडूंचा पगार कमी करणे देखील शक्य आहे. खेळाडूंना गुणोत्तरऐवजी वेळेनुसार रक्कम दिली जाईल.

जर खेळाडूने स्वत:ला स्पर्धेच्या एखाद्या भागासाठी उपलब्ध करून दिले असेल तर पगार प्रमाणानुसार असेल. याचा अर्थ असा की सामने खेळणार्‍या खेळाडूला स्वत: चे पैसे मिळतील. हे पैसे त्याच्या बोलीच्या रकमेपासून विभागले जातील. उदाहरणार्थ, जर एखाद्या खेळाडूला 14 कोटी रुपयात विकत घेतला असेल आणि त्याने फक्त सात सामने खेळले असतील तर त्याला फक्त सात कोटी रुपये मिळतील. एका वरिष्ठ खेळाडूने सांगितले की, जेव्हा खेळाडू स्पर्धेतील काही भागांसाठी स्वईच्छेने स्वत:ला उपलब्ध ठेवतील तेव्हाच लागू होईल. परंतु आत्ताच आयोजकांनी स्पर्धा मध्यभागी थांबविली आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझींना हंगामाच्या निम्म्या पैशाचे पैसे खेळाडूंना द्यावे लागणार.

2000 ते 2500 कोटींचे नुकसान:
दुसरीकडे, बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, ‘या सत्राला मध्यभागी थांबवल्यामुळे 2000 ते 2500 कोटींचे नुकसान होऊ शकते. यामध्ये 2200 कोटींची रक्कम अधिक असेल. 52 दिवसीय आणि 60दिवसीय या स्पर्धेचा 30 मे रोजी अहमदाबाद येथे समारोप होणार होता. तथापि, केवळ 24 दिवस क्रिकेट खेळले गेले आणि या कालावधीत 29 सामन्यांनंतर कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा पुढे ढकलावी लागली.

स्टारचा पंचवार्षिक करार 16 हजार 347 कोटी रुपये आहे, जो दर वर्षी तीन हजार 269 कोटींपेक्षा जास्त असतो. जर एका हंगामात 60 सामने असतील तर प्रत्येक सामन्याची रक्कम सुमारे 54 कोटी 50 लाख रुपये आसते. जर स्टारने प्रत्येक मॅचचे पैसे दिले तर 29 सामन्यांची रक्कम सुमारे 1580 कोटी होते. अशा परिस्थितीत बोर्डला 1690 कोटींचे नुकसान होईल. तसेच मोबाइल उत्पादक विवोने स्पर्धेचे शीर्षक प्रायोजक म्हणून प्रत्येक हंगामात 440 कोटी रुपये भरले आहेत आणि स्पर्धा पुढे ढकलल्यामुळे बीसीसीआयला निम्म्याहूनही कमी रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments