खूप काही

जगातील सर्वात मोठा हिमकडा तुटला, मुंबईसारखी अनेक शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता…

अंटार्क्टिकाजवळील महाकाय हिमखंडाचा तुकडा पडला ,मुंबईसारख्या शहरांना नव्या संकटाची चाहूल

सतत बदलणारे हवामान (Climate change) आणि वाढते ग्लोबल वॉर्मिंग (global warming) यामुळे अंटार्क्टिकाच्या किनाऱ्यापासून वेडेल समुद्रापर्यंत (Weddell Sea) बर्फाचा एक प्रचंड मोठा तुकडा तुटून पडला आहे. वैज्ञानिकांनी सॅटेलाइट आणि विमानातून घेतलेला छायाचित्रांतून हे स्पष्ट झाले आहे की हा बर्फाचा महाकाय तुकडा जगातील सर्वात मोठा हिमखंड आहे.

युरोपियन स्पेस एजन्सीने (Europian space agency) सांगितले आहे की या हिमखंडाला ‘A-76’असे नाव देण्यात आले असून हा विशाल हिमखंड अंटार्क्टिकामधील रॉनी आईस शेल्फच्या पश्चिमेकडून तुटला आहे. याची लांबी 170 किलोमीटर असून रूंदी 25 किलोमीटर आहे. (Giant iceberg near Antarctica collapses, new crisis looms for cities like Mumbai)

ग्लोबल वॉर्मिंगमुळे निर्माण होतोय धोका

ग्लोबल वॉर्मिंग वाढत असल्याने A-76′ हिमखंड झपाट्याने वितळत आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून मुंबईसारख्या किनाऱ्यालगतच्या शहरांना जास्त धोका निर्माण झाला आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे अंटार्क्टिका मधील अनेक हिमनद्या आणि बर्फाचे डोंगरदेखील वितळू लागले आहेत. अशा गोष्टींमुळे मुंबई पाण्याखाली जाण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे. (Global warming poses a greater risk)

मुंबईकरांसाठी एका नव्या संकटांची चाहूल

मुंबईकरांना कोरोना महामारी सोबतच नुकतेच वादळाच्या संकटाला सामोरे जावे लागेल, त्यानंतर आता एक नवे संकट मुंबईचे दार ठोठावत आहे. ग्रीनलँन्ड (Greenland) आणि अंटार्क्टिका (Antarctica) येथील हिमाच्छादित भागातून बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी नऊ इंचाने वाढल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. नेचर मॅगझिनने (Nature magazine) प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामानातील बदलामुळे ध्रुवीय प्रदेशातील (polar region) बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून मुंबईसारखी किनाऱ्यालगतची शहरे पाण्याखाली जाऊन नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे .(A new crisis for Mumbaikars)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments