फेमस

Shikhar Dhawan Flute Video : ओठो से छू लो तुम..’ गब्बरच्या बासरीचे सूर ऐकून तुम्हीही पडाल प्रेमात…

बॅटने चौकार, षटकार मारणाऱ्या शिखरने रोमँटिक गझल वाजवून फॅन्सना 'सुरेल रोमँटिसिझम' अनुभवण्याची संधी दिली. (Shikhar Dhawan Flute Playing Instagram Video)

Shikhar Dhawan Flute Video: ‘ओठो से छू लो तुम….’ जगजीत सिंह यांची ही गझल ही खुपसाऱ्या तरुण-तरुणींना आजही भुरळ घालते. तरुण वर्ग आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आजही या गाण्याचा आधार घेऊन ते व्यक्त करतात. पण आता हेच गाणे एका इंडियन क्रिकेटरने बासरीतून वाजवलं आहे. भारताचा आक्रमक सलामीवीर शिखर धवनचा (Shikhar Dhawan) पंजाबी गाण्यांवरती डान्स करताना त्याचा कोणी हात धरू शकत नाहीच पण आता त्याने त्याच्यातील लपलेलं दुसरे कौशल्य जगासमोर आणलं आहे. त्याने जगजीत सिंह यांची ‘ओठो से छू लो तुम….’ ही अजरामर गझल बासरीतून वाजाऊन सुरावटींनी रसिकांना ऐकवली आहे. गब्बरच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घातला आहे. (Shikhar Dhawan Flute Playing Instagram Video)

शिखरच्या बोटांची जादू :
नेहमी बॅटने चौकार, षटकार मारणाऱ्या शिखरने रोमँटिक गझल वाजवून फॅन्सना ‘सुरेल रोमँटिसिझम’ अनुभवण्याची संधी दिली. शिखरने (Shikhar Dhawan)आपल्या फॅन्सना कोरोनाच्या या वाईट काळात बासरीच्या माध्यमातून प्रेमाचा सुंदर प्रवास ऐकवला आहे. तो इतक्या सुंदर पद्धतीने बासरी वाजवतोय, की त्याची बोटे बासरीवरुन इतक्या मुक्तपणे फिरतायत ती पाहणाऱ्याला तो पट्टीच्या बासरी वादक वाटतोय.

शिखर धवनने (Shikhar Dhawan)आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत तो जगजीत सिंह यांच्या ‘ओठो से छू लो तुम….’ या गझलेची धून वाजवतोय. शिखरच्या या धूनने अनेकांच्या हृदयाच्या तारा छेडला गेला आहे. 1 मिनिट 26 सेकंदाच्या या व्हिडीओमधून शिखरने आपल्यातलं वादन कौशल्य जगाला दाखवून दिलंय.

श्रीलंका दौऱ्यावर शिखर कर्णधारपदी दिसणार :
भारताची इंग्लंड दौऱ्याची जाण्याची तयारी सुरु आहेच. पण शिखर धवनला या दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली नाही.कारण त्याच वेळी भारताची दुसरी टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात शिखर धवनकडे(Shikhar Dhawan) भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते . श्रीलंका दौऱ्यावरच्या संघात जवळपास खूप खेळाडू जे नवीन असणार आहेत.(Shikhar Dhawan can be given the responsibility of captaining India)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments