आपलं शहर

लसींची नोंद करणारी साईट झाली हॅक, मुंबईच्या हॅकर्सनेच केले सर्व स्लॉट बूक

चक्क कोविड व्हॅक्सिनची वेबसाईट झाली हॅक. सामान्य जनता वेबसाइट ओपन करेपर्यंत प्रोग्रामिंगद्वारे सर्व स्लॉट झालेले असतात बुक.

सध्या सोशल मीडियावर अनेक जणांचे अकाउंट, वेबसाइट हॅक होण्याच्या घटना घडत असतात. परंतु यावेळी चक्क कोविड व्हॅक्सिनची वेबसाईट हॅक होण्याची बातमी समोर आली आहे. covid-19 व्हॅक्सिनचे (covid vaccine) स्लॉट बुक करण्यासाठी सरकारद्वारा बनवली गेलेली वेबसाईट हॅक झाली.

लोक दिवसभर व्हॅक्सिनसाठी स्लॉट बुक करायची वाट बघत आहेत. परंतु लोक बुक करण्याच्या आधीच सर्व स्लॉट बुक झालेले पाहायला मिळतात. घटना समजताच क्राइम ब्रांच इंदौरचे एसपी जीपी पारसिक यांनी शोध घेण्यास सुरू केले. त्यांनी सांगितले की, कोविड व्हॅक्सिनेशन साईटबद्दल मिळलेली माहिती खरी निघाली तर त्या आरोपी वर कडक कारवाई केली जाईल.(Vaccine registration site hacked, all slot books done by Mumbai hackers)

व्हाट्सअप ग्रुपद्वारे दिली जाते स्लॉटची माहिती
इंदौरमधील सायबर लॉ स्टूडेंट आयुष तिवारी याने स्लॉट बुक करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु बुक करण्याआधीच सर्व स्लॉट बुक झाले. म्हणून तो व्हॅक्सिन सेंटरवर गेला. तिथे काही तरुण टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपवरून इतर लोकांची माहिती शेअर करत होते. पडताळणी केल्यावर असे समोर आले की मुंबईचा हॅकर सत्यम गोयल याने सोशल मीडियावरून एपीआयद्वारे गव्हर्मेंटच्या साईटला हॅक केले आहे.(Slot information is provided by WhatsApp Group)

या साईटसाठी अशी प्रोग्रामिंग बनवली आहे जी सर्व स्लॉट स्वतःच बुक करते. इंदौर, भोपाल, देवास, चंदिगड त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये देखील असे ग्रुप बनवले आहेत ज्यात स्लॉट उपलब्द्ध झाल्याची माहिती दिली जातेय.

प्रोग्रामिंगद्वारे सर्व स्लॉट बुक करून ते लोकांना विकले जातात
सायबर स्टुडन्टने वेबसाइटसाठी एक प्रोग्राम तयार केला. प्रोग्रामिंग स्वतःहून स्लॉट उपलब्ध आहे की नाही याचा शोध घेते व स्लॉट उपलब्ध असल्याची माहिती प्रोग्रामरला देते. एकीकडे सामान्य माणूस दिवसाला 10 ते 20 वेळा साईटवर स्लॉट उपलब्ध आहे की नाही पाहत असतो. तर दुसरीकडे असे प्रोग्राम सगळेच स्लॉट बुक करून टाकत आहे. त्यानंतर प्रोग्रामर हे स्लॉट विकत असे.

स्लॉट सुरू होताच प्रोग्रामला माहिती मिळते. त्याचबरोबर हा प्रोग्राम या वेबसाईटवर स्वतःहूनच माहिती देखील भरत आहे. सामान्य जनता जोपर्यंत ती वेबसाइट ओपन करते तोपर्यंत प्रोग्रामिंगद्वारे सर्व स्लॉट बुक झालेले असतात.(All slots are booked through programming then they are sold to people)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments