फेमस

Virat Kohli’s Reply विरुष्का तुम्ही मुलीचा फोटो कधी दाखवणार, प्रश्नाचा विराटचं डिफेंडेबल उत्तर…

विराटने इंस्टाग्रामवर 'आस्क मी क्वेशन' टाकले होते. ज्यावर विराटच्या अनेक चाहत्यांना विराटला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली

वर्ल्ड चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जून ते 22 जून दरम्यान केला जाणार असून भारत विरुद्ध न्यूझीलंड या दरम्यान हा सामना पार पडणार आहे. त्याचबरोबर भारताला इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेआधी खेळ खेळायचे आहे. त्यामुळे भारतीय संघ इंग्लडला जाणार असल्याने संपूर्ण टीमला मुंबईमध्ये क्वारंटाइन केले आहे.

भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन विराट कोहलीला देखील मुंबईमध्ये टीमबरोबर क्वारंटाइन केलेले आहेत. विराट कोहलीला शनिवारी इंस्टाग्राम वर ऑनलाइन गप्पा गोष्टी करण्याचा मूड झाल्याने विराटने इंस्टाग्राम वर ‘आस्क मी क्वेशन’ टाकले होते. ज्यावर विराटच्या अनेक चाहत्यांना विराटला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली.(Virat Kohli reveals daughter Vamika’s name’s meaning, why her picture isn’t made public )

चाहत्याने विचारले वामिकाबद्दल प्रश्न
एका चाहत्याने असा प्रश्न विचारला की, तुझ्या लेकीच्या नावाचा अर्थ काय आहे? ती आता कशी आहे? तुझी लेक वामिकाचा चेहरा तू सगळ्यांना कधी दाखवणार आहेस? असे एका मागोमाग तीन प्रश्न विराटला विचारले गेले. त्यावर विराटने लोकांना पटेल आणि आवडेल असे उत्तर दिले आहे.(The fan asked a question about Virat’s daughter Wamika)

IMG 20210530 WA0001

सोशल मीडियावर फोटो टाकण्याबद्दल वामिका स्वतः निर्णय घेईल
या प्रश्नावर विराटने असे उत्तर दिले की, वामिका देवी दुर्गाचे दुसरे नाव आहे. मी आणि अनुष्काने मिळून असे ठरवले आहे की, आपण वामिकाचा फोटो सोशल मीडियावर तोपर्यंत टाकायचा नाही जोपर्यंत तिला सोशल मीडिया म्हणजे काय हे समजणार नाही. तिचा फोटो सोशल मीडियावर कधी टाकायचा या संदर्भात वामिका तिचा निर्णय स्वतः घेईल. त्यामुळे विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचा चेहरा आजपर्यंत कधीही सोशल मीडियावर पोस्ट केलेला नाही.(Wamika will decide for herself about posting photos on social media)

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

अनुष्काने देखील विचारला प्रश्न
विराट आणि अनुष्का शर्मा यांनी 2017 मध्ये लग्न केले होते. वामिकाचा जन्म 11 जानेवारी 2021 मध्ये झाला. त्याचबरोबर विराट कोहलीने स्वतःच्या डाईटबद्दल देखील या सेक्शनमध्ये सांगितले. याचबरोबर यामध्ये अनुष्का शर्माने देखील विराट कोहलीला एक प्रश्न विचारला होता. तिने असे विचारले होते की, माझे हेडफोन तू कुठे ठेवले आहेस. अनेक चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारले होते.(Anushka also asked Virat a question on Instagram)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments