आपलं शहर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे टार्गेट कोणता वयोगट असणार?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये सगळ्यात जास्त धोका लहान मुलांना असणार..

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप चालूच आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच आता तिसरी लाट येण्याची चर्चा सुरू झाली आहे. विजय राघवन यांच्यासह अनेक विशेषज्ज्ञांनी तिसऱ्या लाटे बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

मागील वर्षी कोरोनाची सुरुवात मार्च महिन्यापासून झाली होती आणि ऑगस्ट-सप्टेंबरनंतर हळू हळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसली. या वर्षीदेखील दुसऱ्या लाटेने मार्चमध्ये सुरुवात केली आणि अजूनही कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आलेली नाही. पहिल्या लाटेमध्ये 60 वर्षावरील तर दुसऱ्याला लाटेमध्ये तरुणांना जास्त प्रमाणात कोरोनाची लागण होताना दिसत आहे.(What age group will be the target of the third wave of corona?)

लोकांच्या मनात असे प्रश्न आहेत की, तिसरी लाट कधीपर्यंत येणार? आणि तिसऱ्या लाटेचे टार्गेट नक्की कोणता वयोगट असणार? तज्ञांनी असे सांगितले की, या महिन्यात दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी व्हायला सुरुवात होईल. पहिली लाट आणि दुसरी लाट यांच्यामध्ये काही महिन्यांचे अंतर होते तसेच दुसरी आणि तिसरी लाट यांच्यामध्ये तीन ते चार महिन्यांचे अंतर असणार आहे.

पहिल्या लाटेमध्ये साठ वयोगटावरील लोक, दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांना कोरोनाची लागण झाल्याने आता अशी शंका की, तिसऱ्या लाटेमध्ये सगळ्यात जास्त धोका लहान मुलांना असणार आहे. परंतु ही तिसरी लाट कधी व कोणत्या रूपात येणार आणि याचा सर्वात जास्त परिणाम कोणत्या वयोगटावर होणार याचा अंदाज लावणे कठीण आहे. परंतु दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनादेखील कोरोनाची लागण झालेली दिसून येते. परंतु त्यांची बॉडी ग्रोथ पिरिअड चालू असताना कोरोना झाल्यास ते कोरोनावर मात करू शकतात. दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

लहान मुलांना कोरोनापासून वाचवायचे असेल तर त्यांना आतापासूनच मास्क लावण्याची सवय केली पाहिजे. त्याच बरोबर त्यांना बाहेर खेळायला किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून पालकांनी रोखले पाहिजे. बाहेरचे अन्नपदार्थ बंद करून मुलांना पौष्टिक आहार दिला पाहिजे. मुलाची तब्येत बिघडल्यास किंवा कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास तुरंत टेस्ट करून घ्यावी आणि पालकांनी मुलांवर नीट लक्ष द्यावे.

1 मेपासून अठरा वर्षांवरील तरुणांना लसीकरणास परवानगी दिली गेली. परंतु 12 वर्षांवरील लहान मुलांना लस देण्याची परवानगी अजूनही दिलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या आधी लहान मुलांना कोरोनाची लस देण्याची गरज आहे. त्यांचे लसीकरण झाल्यास ते सुरक्षित असतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments