खूप काही

New Rules of Facebook फेसबुक, ट्विटरवर सरकार सरकारची कारवाई, बॅन होण्याची शक्यता…

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांना भारतात बंदी लागण्याची शक्यता आहे.

New Rules of Facebook : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांना भारतात बंदी लागण्याची शक्यता आहे. भारत सरकारने नव्याने लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास ही बंदी लागू शकते. (What happens to Facebook Twitter account on May 26)

सरकारने ठरवलेली मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारण्याची अंतिम मुदत 25 मेपर्यंत होती, अद्याप कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकारने तीन महिन्यांपूर्वी लागू केलेल्या नवीन नियमांचे पालन केले नाही. या कंपन्यांनी 25 मेपर्यंत नवीन नियमांची अंमलबजावनी न केल्यास त्यांची भारतातील त्यांची सुरक्षितता आणि स्थिती गमावतील. प्लॅटफॉर्मच्या मध्यस्थ्यांसह संबंधिक अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊ शकते, असे एका सरकारी अधिकाऱ्याने एका निवेदनात म्हटले आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MEITY) नवीन आयटी नियमांचे पालन करण्यासाठी सोशल प्लॅटफॉर्मवर तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. यावर फेसबूकने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. फेसबूककडून ऑपरेशनल प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचे काम सुरु आहे, सरकारने लागू केलेल्या काही नियमांची अंमलबजावणी केली जाईल, असंही फेसबूककडून स्पष्टीकरण आलं आहे. लोक आमच्या व्यासपीठावर मुक्तपणे आणि सुरक्षितपणे आपलं मत मांडू शकतात, त्यासाठी फेसबुक वचनबद्ध असेल, असही स्पष्टीकरण फेसबूककडून आलं आहे. (What are the new rules of Facebook, Twitter, Instagram)

MEITY चे नवीन नियम काय
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नवीन नियमांनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारताकडून अनुपालन अधिकारी नियुक्त करावे लागतील.

नियुक्त केलेला अधिकारी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचे निवारण करेल, आक्षेपार्ह पोस्टचे परीक्षण करेल आणि आक्षेपार्ह असेल तर ती पोस्ट काढून टाकेल.

असे नियम केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच लागू नाहीत तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील लागू आहेत.

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम आणि यांसारख्या इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर तक्रार नोंदवून घेणारे अधिकारी नियुक्त करावे लागतील जे तक्रारींची दखल घेतील आणि त्यावर 15 दिवसांत कार्यवाही करतील.

नव्या नियमांमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की भारतामध्ये स्थापन केलेल्या समितीच्या नियमांचे उल्लंघन प्लॅटफऑर्मकडून झाल्यास कारवाई करण्याचे सगळे अधिकार समितीकडे असतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments