खूप काही

CBI : सीबीआय संचालकांना कोणते आहेत अधिकार? त्यांचा पगार किती…

सेंट्रल ब्‍यूरो ऑफ इनवेस्टिगेशन (CBI) पदी नियुक्ती झालेला व्यक्तीला कोणते असतात अधिकार तर त्यांना दरमहा किती पगार असतो.

CBI : आयपीएस अधिकारी सुबोध जयस्वाल यांची सेंट्रल ब्‍यूरो ऑफ इनवेस्टिगेशन (CBI) ची नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी सीबीआयचे संचालक म्हणून जयस्वाल यांचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा असेल अशी सूचना सरकारने जाहीरी
केली आहे.( powers of CBI Director)

जयस्वाल यांना सीबीआय संचालक (CBI Director) म्हणून मिळणारा पगार हा हायकोर्टाच्या न्यायाधीशांइतकाच असतो. त्यांना निश्चित मूलभूत पगार म्हणून 80 हजार रुपये मिळतात. याशिवाय त्यांना मूलभूत पगारावर अनेक प्रकारचे वेगवेगळे भत्ते मिळतात. मूलभूत पगाराच्या 120 टक्के महागाई भत्ता (DA) आहे. विशेष प्रोत्साहन भत्ता 15 टक्के असतो. तरी सीबीआय संचालकांचे वेतन हे प्रत्येक महिन्याला 1.60 लाख ते 2.20 लाख रुपयांपर्यंत असतो. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा पगार हा दर महिन्याला सुमारे 2.2 लाख इतका आहे.

हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांचा भत्ता जोडून दरमहा सुमारे 2.50 लाख इतका पगार होतो. तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचे समान वेतन आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा पगार दर महिन्याला सुमारे 2.80 लाख आहे. सीबीआय संचालकांनी(CBI Director) एक समिती नेमली आहे. या समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा त्यांच्यामार्फत शिफारस केलेले न्यायाधीश असतात.

कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयला(CBI) पहीले केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. एखाद्या फौजदारी खटल्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने सीबीआयला(CBI) विनंती केली असली तरीही त्यांना केंद्राची परवानगी मिळणे आवश्यक आहे. याशिवाय सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टही सीबीआयला एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देऊ शकते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments