आपलं शहर

Drive through vaccination : नक्की काय आहे मुंबईचे ड्राइव थ्रू वैक्सीनेशन मॉडेल? जाच्या मार्गावर आहेत बरीच राज्ये…

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेता सर्वांना सुखरुप लसीकरणासाठी मुंबईत 'ड्राइव्ह थ्रू लसीकरण' अभियान राबविण्यात आले आहे.

Drive through vaccination : कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी, देशातील लोकांना जलद गतीने लसीकरण (vaccination) करण्यावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची वाढती घटना लक्षात घेता सर्वांना सुखरूप लसीकर(vaccination) घेणासाठी मुंबईत लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. मुंबईत ‘ड्राईव्ह थ्रू वैक्सीनेशन मॉडेल’ यशस्वी झाल्यानंतर हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत याची अंमलबजावणी केली जात आहे. (Drive through vaccination in Mumbai)

ड्राइव थ्रू वैक्सीनेशन म्हणजे काय?
महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये कोरोनाच्या वाढत्या संक्रमणादरम्यान लोकांना सुरक्षित लसीकरण देण्यासाठी पहिल्यांदा मुंबईतील दादर येथे लसीकरण(vaccination) मोहीम सुरू केली गेली. या मोहिमेअंतर्गत कारमध्ये बसून लोकांना लस दिली जात आहे. म्हणजेच कोरोना लस घेण्यासाठी त्यांना कारमधून बाहेर येण्याची गरज नाही. दादरमध्ये ‘ड्राईव्ह थ्रू लस’ (Drive through vaccination) अभियान यशस्वी झाल्यानंतर पुढील 24 तासांत आणखी सात लसीकरण केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात आली आहे.(People are being vaccinated in cars)

‘ड्राइव थ्रू वैक्सीनेशन’ करण्याची गरज का होती?

1 मेपासून मुंबईत 18+ वर्षांवरील लोकांचे लसीकरण(vaccination) सुरू झाले होते तेव्हा एकाच ठिकाणी गर्दी होण्यापासून रोखण्यासाठी हे सुरू केले होते. यापूर्वी फक्त 45 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक, कामगार आणि आरोग्य कर्मचारी लस घेत होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments