खूप काही

तुम्हाला माहित आहे का पायलट विमान चालवताना विमानातील सर्व तेल खाली का टाकतात..

फ्युल डंपिंग म्हणजे काय आणि ते का केलं जातं?

तुम्हाला माहित आहे का ? अनेकदा असा प्रसंग येतो की पायलटला विमानातील सर्व तेल खाली टाकावे लागते आणि हे काम पायलट विमान हवेत असतानाच करतात. परंतु असं इमर्जन्सी असल्यावरच करावे लागते. विमानातून तेल खाली टाकल्यावर खाली जमिनीवर त्याचं काय होत असेल? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्याचे उत्तर असा आहे की, विमानातून टाकलेले तेल जमिनीपर्यंत पोहोचतच नाही. हे तेल हवेतच धुर बनुन उडून जाते.

असाच एक प्रसंग 23 मार्च 2018 रोजी घडला होता. शंगाईवरून विमानाने न्यू यॉर्कसाठी उड्डाण घेतले होते. त्या विमानातील साठ वर्षाच्या महिलेची तब्येत अचानक बिघडली. त्यांना श्वास घ्यायला येत नव्हता. त्यांची परिस्थिती जास्त बिघडत चालली होती. त्यामुळे पायलटला देखील इमर्जन्सी लँडिंग सोडून दुसरा कोणताही पर्याय समोर दिसला नाही. तेव्हा विमाना मधील 65,000 पाउंड गॅसोलीन विमानातून खाली सोडावे लागले. जवळपास 20 हजार डॉलरचे तेल विमानातून सोडून दिल्यावर विमान लँड करू शकले आणि त्यामुळे त्या महिलेचे प्राण वाचवण्यात यश मिळाले.(what is fuel dumping)

इमर्जन्सी लँडिंगच्या आधी फ्युल डंपिंग केले जाते. विमानामध्ये तेल जास्त प्रमाणात असते त्यामुळे तेलाचे वजन देखील जास्त असते इमर्जन्सी लँडिंग करताना वजनामुळे अडचण निर्माण होऊ नये म्हणून तेल सांडून विमानाचे वजन हलके केले जाते. तेव्हाच इमर्जन्सी लँडिंग करणे शक्य होते. प्लेनची डिझाईन देखील अशा पद्धतीने बनवलेले असते की, मर्यादित वजन घेऊनच विमान लँड करू शकते. जर विमानाचे वजन जास्त असेल तर ते जोरात जमिनीवर आपटू शकते आणि त्यामुळे मोठे नुकसान देखील होऊ शकते.

विमानातून तेल खाली सोडले जाते त्याला फ्यूल डंपिंग असे म्हणतात. ज्यावेळेस मेडिकल इमर्जन्सी असते किंवा अशी कोणतीही परिस्थिती उद्भवते ज्यात विमान लँड करणे गरजेचे असते. त्याच वेळेस पायलट फ्युल डंपिंगचा निर्णय घेतात. फ्युल डंपिंगचा निर्णय पायलट आणि क्रू मेंबर मिळून घेतात.

विमानात 5000 गैलन तेल असते. जे तीन हत्तींच्या वजनात इतके असते. विमान उड्डाण भरायच्या आधी पायलट अंदाज लावतात कि एका फेरीमध्ये किती तेल लागू शकते. तीतकेच तेल विमानात भरले जाते. त्यामुळे तेल विमानतळावर पोहोचण्याच्या आधी संपते आणि विमानाचे वजन हलके होते व विमान लँड करता येते. परंतु कधी कधी असे होते की स्थळावर पोचल्यावर देखील विमानात तेल शिल्लक राहते तेव्हा पायलट हवेतच विमानाने चक्कर मारून मारून तेल संपवतात आणि मगच विमान खाली जमिनीवर लँड करतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments