आपलं शहर

वाचा नक्की काय आहे, मुंबई मॉडेल, ज्याच सर्वोच्च न्यायालयाने केलय कौतुक

काय आहे मुंबई मॉडेल?

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा देखील कमी पडत आहे. प्रचंड प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी ‘मुंबई मॉडेल’ स्वीकारले जावे असे दिल्ली सरकारला सांगण्यात आले.

बुधवारी रात्री दिल्ली सरकार आणि इक्बाल सिंह चहल यांच्यामध्ये एक बैठक झाली. या बैठकीमध्ये इक्बाल सिंह चहल यांनी असे सांगितले की, कोरोनाव्हायरसची तीव्रता थांबविण्यासाठी प्रामाणिकपणा असेल तरच ‘मुंबई मॉडेल’ इतर राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये राबवण्यात येईल. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले की, दोन महिन्यापूर्वी केंद्र सरकारच्या काही सहकाऱ्यांचा मला फोन येत होता आणि त्यावेळी कोरोना फक्त महाराष्ट्रातच आहे. असे बोलून ते हसत होते. जर कोणी आमच्या वर हसत असेल तर अशा लोकांबरोबर मी माझे मॉडेल कसे शेअर करू? जर प्रामाणिकपणा असेल तरच ‘मुंबई मॉडेल’ इतर राज्यांमध्ये राबविण्यात येईल.(What is Mumbai Model BMC severe shortage oxygen)

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मुंबईत कोणाचाही मृत्यू झालेला नाही, त्यामुळे ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा करणे, उपलब्ध ऑक्सीजनचा योग्य वापर करणे,यासह बीएमसीची विद्यमान संसाधने एकत्रित करण्याच्या क्षमतेमुळेच मुंबईची ऑक्सिजन समस्या आता “इतिहास” झाली आहे . 16 आणि 17 एप्रिलच्या मध्यरात्री सहा शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने मध्यरात्री 168 रुग्णांना रुग्णालयातून हलवण्यात आले. त्यामुळे कोणत्याही रुग्णांच्या जीवावर बेतलं नाही. या घटनेमुळे 17 एप्रिलला बीएमसीने राज्य टास्क फोर्सकडे ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रोटोकॉलची मागणी केली.

ऑक्सिजन विषयी कोणतीही शंका, प्रश्न उद्भवू नये यासाठी केंद्रात पोस्टिंग दरम्यान काम करत असणाऱ्या अधिकाऱ्यांशी दिल्लीमध्ये संपर्क साधला. राज्यातील आठ शीर्ष राजकारणी त्याचबरोबर कॅबिनेट सचिव राजीव गौबा, गृहसचिव, आरोग्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना याबाबद संदेश दिला व ऑक्सिजनची आयात करण्यासाठी केंद्राला सूचना दिल्या.

हलदियातील युनिटमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आठ दिवसांचा वेळ लागणार होता. हा कालावधी जास्त असल्याने कॅबिनेट सेक्रेटरीला जामनगरमधील रिलायन्स इंडस्ट्रीज मधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितले गेले. ऑक्सिजनची आयात करण्यासाठी फक्त 16 तासांचा कालावधी लागला. त्यादिवशी दुपारी एक वाजेपर्यंत जामनगरमधून 25 टन ऑक्सिजनची आयात करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काम करण्यासाठी फ्री हॅन्ड दिल्याने हे झाले. त्यामुळे त्यांचे आभार, असेही इकबाल सिंग चहल यांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेची तयारी मुंबईमध्ये केली जात आहे. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्लांट्स लावण्यात येत आहेत. मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाली. तर मे महिन्यापर्यंत कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना आयुक्त पदाचा कार्यभार चहल यांनी स्वीकारला. त्यानंतर बेडसाठी डॅशबोर्ड तयार करणे,वॉर्ड वॉर रूम तयार करणे, कोविड चाचणी अहवाल खाजगी लॅब कडून डायरेक्ट रूग्णांना देण्यास बंदी घालणे, यासंह विविध उपाययोजना करण्यात आल्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments