खूप काही

Mumbai Mucormycosis Update : मुंबईत काळ्या, पिवळ्या, पांढऱ्या बुरशीजन्य रुग्णांची काय परिस्थिती, जाणून घ्या त्यांची लक्षणे…

राज्यात असलेल्या कोरोना बरोबरच आता म्यूकोरामायसिस म्हणजेच काळ्या बुरशीची समस्या देखील वाढत आहे.

Mumbai Mucormycosis Update : राज्यात असलेल्या कोरोना बरोबरच आता म्यूकोरामायसिस म्हणजेच काळ्या बुरशीची समस्या देखील वाढत आहे. या बुरशीचे समोर येणारी नवी रुपे चकित करणारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून काळ्या बुरशीच्या व्यतिरिक्त, यूपी, हरियाणा आणि इतर राज्यांत पांढर्‍या आणि पिवळ्या बुरशीचे संसर्ग असलेले रुग्ण आढळले आहेत. यात बीएमसीच्या प्रमुख रुग्णालयात दीडशेहून अधिक ब्लॅक फंगसचे रुग्ण दाखल झाले आहेत. (What is the condition of black, yellow and white fungal patients in Mumbai, find out their symptoms)

बीएमसीसमोर तिन्ही म्यूकोर्मिकोसिसचे आव्हान

या नव्या रंगाबाबत बीएससीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यामते म्यूकोरामायसिसचा सामना करण्यासाठी बनवलेल्या डॉक्टरांच्या विशेष पथकास (Task Force) बुरशीच्या नव्या निधानाबाबत तपासणी करणअयास सांगितले आहे. मुंबईतही पांढरे, पिवळे बुरशीचे रुग्ण आहेत का? हे शोधण्यासाठी डॉक्टरांना आवाहन केले आहे.

म्यूकोरामायसिसच्या सुरुवातीच्या अवस्थेत शरीरात पांढर्‍या पेशी असतात. यानंतर, त्यांचा रंग बदलतो. शेवटच्या टप्प्यात त्याचा रंग काळा होतो. कूपर येथे सध्या ब्लॅक फंगसचे 17 रुग्ण दाखल आहेत. एम्फोटेरिसिन इंजेक्शन आणि शस्त्रक्रिया ही त्यावर उपचार आहेत. अशा अनेक रुग्णांवर उपचारदेखील केले जात आहेत, अशी माहिती कूपर रुग्णालयाच्या ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. निनाद गायकवाड यांनी दिली आहे. (The challenge of all three mucorrhoea before BMC)

काय आहेत लक्षणे

सर्दी, डोकेदुखी, चेहऱ्यावर सूज येणे, अशी अनेक प्राथमिक लक्षणे म्यूकोरामायसिसच्या रुग्णामध्ये आढळून येतात. जर तसं असेल तर तत्काळ तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घ्या. लवकर उपचार घेतला तर शस्त्रक्रियेचीदेखील गरज भासणार नाही. हे टाळण्यासाठी दुहेरी मास्क घाला, आपल्या नाकाला वारंवार स्पर्श करू नका, मधुमेह सारख्या आजारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला डॉ. निनाद यांनी दिला आहे…

पिवळ्या बुरशीचे लक्षण

पिवळी बुरशी नागरिकांसाठी अधिक धोकादायक असते. या रोगास म्यूकोरस्पेक्टिक्स म्हणतात. आपल्या शरिराचे अवयव कमजोर होणे, अंगाला त्रास जाणवणे, अशक्तपणा, नाकाची शीडशीड, हृदयाचे ठोके वाढणे, जखमेतून पांढरा पदार्थ येणे आणि कुपोषित दिसणे ही या आजाराची लक्षणे आहेत. (symptoms of yellow fungus)

म्युकरमामयकोसिसची सध्या परिस्थिती काय?

नवी मुंबईत 29 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मनपाच्या वाशी रुग्णालयात काळ्या बुरशीच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. आतापर्यंत 14 लोकांना या आजाराची लागण झाल्याचे आढळले आहे, तर 15 लोक शहराबाहेरून येत असून येथे उपचार घेत आहेत. नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या माहितीनुसार मनपाच्या क्षेत्रात काळ्या बुरशीचे 29 रुग्ण आढळले आहेत. (What is the current status of myocardial infarction?,)

काळ्या बुरशीची परिस्थिती काय

नवी मुंबई मनपाने आत्तापर्यंत अनेक लोकांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. ज्याच्यामध्ये कोरोनातून बरे झालेले, ज्यांना मधुमेहाची लगाण आहे, इतर अनेक आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची यादी तयार केली जात आहे. तशा नागरिकांसाठी कॉल सेंटर सुरु करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांची विचारपूस सुरु राहील. काळ्या बुरशीची लक्षणे जाणून घेण्यासाठी कॉल केला जातो. एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणे आढळल्यास, त्याला मनपा रुग्णालयात ओपीडीमध्ये तपासणीसाठी पाठविण्याची तयारी सुरू केली जाते. आणि मनपाच्या वाशी, नेरूळ आणि ऐरोलीच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातात. (What is the condition of black fungus)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments